करोना हे जागतिक नाट्य: सुषमा देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST2020-12-05T04:16:52+5:302020-12-05T04:16:52+5:30
पुणे : ''''''''करोनाचे स्वतंत्र जागतिक नाट्य सुरू झाले आणि जागतिक रंगभूमीवरच्या नाटकाने ''''''''पॉझ'''''''' घेतला. करोनाच्या नाट्यात जगातील प्रत्येक व्यक्तीने ...

करोना हे जागतिक नाट्य: सुषमा देशपांडे
पुणे : ''''''''करोनाचे स्वतंत्र जागतिक नाट्य सुरू झाले आणि जागतिक रंगभूमीवरच्या नाटकाने ''''''''पॉझ'''''''' घेतला. करोनाच्या नाट्यात जगातील प्रत्येक व्यक्तीने आपआपल्या पद्धतीने उत्तम काम केले. आज इतक्या महिन्यानंतर रंगभूमी खुली झाल्याने खूप थ्रिल वाटत आहे, अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे यांनी शुक्रवारी केली.
इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्टस अँड रिसर्चच्या वतीने १० डिसेंबरपर्यंत आयोजित ''''''''आयपार इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल’चे उद्घाटन देशपांडे यांच्या हस्ते एरंडवणे येथील ‘द बॉक्स’ थिएटरमध्ये झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
मास्क घातलेल्या आणि सुरक्षित अंतराचा नियम पाळणाऱ्या सुजाण प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा महोत्सव सुरू झाला. तापमान मोजून ठरावीक प्रेक्षकांना थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला. देशपांडे यांच्या हस्ते तिसरी घंटा झाली आणि नाटकासाठी आसुसलेल्या रंगकर्मींनी आणि प्रेक्षकांनी दाद दिली. महोत्सवाचे संचालक प्रसाद वनारसे यांनी प्रास्ताविक केले.
कॉस्टंट अॅक्ट्स ऑफ डिसओबेइंगची संकल्पना आणि दिग्दर्शन आदिती व्यंकटेश्वरन यांची होती. मारगॉट बॅरेट (फ्रान्स), सायली कुलकर्णी, तन्वी हेगडे व विक्रांत ठकार हे कलावंत सहभागी झाले होते. ‘अव्यक्त’ नाट्यप्रयोगाची संकल्पना आणि दिग्दर्शन आशिष वझे यांचे होते. स्टेफनी कास्त्रेजोन (अमेरिका) व प्रियांका भावे सहभागी झाले होते. गायिका श्रुथी वीणा विश्वानाथ हिची ‘चेंजमेकर’ म्हणून निवड करण्यात आली.
दरम्यान, क्रिएटिव्ह क्रॉसओव्हर या प्रकल्पांतर्गत ''''''''फॉल अगेन, फ्लाय बेटर’ हा एकपात्री प्रयोग ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच आणि सात वाजता होणार आहे. कुमार जोशी स्मृती नाट्यवाचन स्पर्धेतील तमाशा निर्मित ‘आद्रियानो’ आणि निळू फुले कला अकादमी निर्मित ‘खानदानी’ चे वाचन ६ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ रंगकर्मी शुभांगी दामले यांच्या हस्ते होणार आहे.
--