नीरा रयत संकुलात कर्मवीर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:13 IST2021-09-24T04:13:42+5:302021-09-24T04:13:42+5:30

महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय आणि लीलावती रिकवलाल शहा कन्या शाळेच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमा पुजन करुन शिक्षक ...

Karmaveer Jayanti celebration at Nira Rayat Sankul | नीरा रयत संकुलात कर्मवीर जयंती साजरी

नीरा रयत संकुलात कर्मवीर जयंती साजरी

महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय आणि लीलावती रिकवलाल शहा कन्या शाळेच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमा पुजन करुन शिक्षक व सेवकांनी पुष्प अर्पण केले. यावेळी स्थानिक स्कूल कमेटीचे सल्लागार लक्ष्मण चव्हाण व कमेटीचे सदस्य संतोष गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे, राजेश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन, पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य गोरख थिटे, पर्यवेक्षक जयंतकुमार दाभाडे, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा बोडरे, पर्यवेक्षक उत्तम लोकरे यांसह अध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

निबंध वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते संस्थेने ऑनलाइन प्रश्नमंजूषा स्पर्धेत आयोजन केले होते. मुलींनी दारासमोर रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह वडाचे झाड व रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ अशी रांगोळी काढून फोटो ग्रुपवर टाकले होते.

फोटोओळ : नीरा येथील रयत संकुलनात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना लक्ष्मण चव्हाण, संतोष गांधी, शिक्षक व सेवक वर्ग.

Web Title: Karmaveer Jayanti celebration at Nira Rayat Sankul