वाल्हे येथील माळरानांवर फुलवली कामिनी व ड्रगन फ्रुटची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:15 IST2021-09-09T04:15:47+5:302021-09-09T04:15:47+5:30
वाल्हे : नजीक पवारवाडी येथील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी महेंद्र पांडुरंग पवार यांनी शेती परवडत नाही असा नकारात्मक विचार ...

वाल्हे येथील माळरानांवर फुलवली कामिनी व ड्रगन फ्रुटची शेती
वाल्हे : नजीक पवारवाडी येथील प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी महेंद्र पांडुरंग पवार यांनी शेती परवडत नाही असा नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्याच्या पुढे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक पीक न घेता माळराना सारख्या खडकाळ भागात कामिनी फुलांची शेती फुलवली आहे. यातून भरघोस उत्पादन घेत आहेत.
फुलांच्या शेतीबरोबरच गुलछडी, रक्तचंदन, बांबू, कोरफड, खजूर, ड्रगन फ्रुट या सारख्या पिकांची लागण केली आहे. ऐनवेळी या सारख्या पिकांना बाजार मिळाला नाहीतर खचून न जाता याच मालावर स्वत:च उत्पादक प्रक्रिया करूनदेखील चांगले उत्पादन घेता येते त्याचेच हे उत्तम उदाहरण आहे.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेतकरी महेंद्र पवार.
कृषी महाविद्यालय पुणे यांच्या ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१ अंतर्गत विद्यालयाचे प्रा.डॉ.एच.पी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कंन्या कांचन भगवंत कदम या विद्यार्थिनीने प्रयोगशील शेतकरी महेंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांच्या यशस्वी प्रयोगाचा आढावा घेतला व इतर शेतकऱ्यांनी महेंद्र पवार यांची प्रेरणा घेऊन यशस्वी व्हावे, असे प्रतिपादन केले.