कांबळे यांच्या कवितेस राज्यस्तरीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:36 IST2018-10-05T01:36:17+5:302018-10-05T01:36:40+5:30

पारितोषिक वितरण सोहळा मालेगाव येथील अरोमा थिएटर येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अजय बिरारी, साहित्यिक रंजन खरोटे, प्रा. अशोक शिंदे

Kamble's poetic state-level award | कांबळे यांच्या कवितेस राज्यस्तरीय पुरस्कार

कांबळे यांच्या कवितेस राज्यस्तरीय पुरस्कार

लोणी काळभोर : अंधश्रद्धा निर्मूलन वैज्ञानिक दृष्टिकोन समितीमार्फत आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेत थेऊर (ता. हवेली) येथील सावित्री कैलास कांबळे यांच्या कवितेस राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

पारितोषिक वितरण सोहळा मालेगाव येथील अरोमा थिएटर येथे पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अजय बिरारी, साहित्यिक रंजन खरोटे, प्रा. अशोक शिंदे, कीर्तनकार रावसाहेब राऊळ, भाजपा विधानसभा निरीक्षक अण्णा सावंत, आदर्श शेतकरी युवराज देवरे, चंद्रशेखर देवरे, अहिराणी साहित्यिक रमेश बोरसे, ‘चिमटा’कार मिलिंद धोदरे, सल्लागार डॉ. रवी अहिरे उपस्थित होते. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ४१९ कवींनी अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर कविता पाठविल्या होत्या. त्या पैकी २० कवींचा सत्कार करण्यात आला.

मालेगावी सोहळा : २० कवींचा सत्कार
 

Web Title: Kamble's poetic state-level award

टॅग्स :Puneपुणे