कळंबचा सुलतान डांगे गाजवणार प्रो-कबड्डी लीग
By admin | Published: June 3, 2017 01:38 AM2017-06-03T01:38:49+5:302017-06-03T01:38:49+5:30
कळंब (ता. इंदापूर) येथील वालचंद विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या २२ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली असून २ सहायक
लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथील वालचंद विद्यालयामध्ये शिक्षण घेतलेल्या २२ विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली असून २ सहायक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. यातील सुलतान डांगे याने कबड्डी या खेळाला वाहून घेत कळंब गावाचे नाव महाराष्ट्रात चमकवले. याच सुलतानची लीगमध्ये गुजरात संघासाठी साडेसोळा लाखांची बोली लागली. या गावच्या मातीने कबड्डी खेळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक इतिहास रचला आहे, असे मत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
कळंब येथील महाराणा संघाचा शिलेदार असलेल्या सुलतान डांगे याची पुढील महिन्यात होणाऱ्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेच्या गुजरात संघासाठी निवड झाल्याने कळंबमध्ये आनंदोत्सव साजरा केला. कळंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सुलतान डांगेंसह गावातील सहायक पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या नवनाथ शेंडगे व महाराष्ट्रात सर्वात लहान वयात पोलीस खात्यातून सहायक पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झालेल्या रवींद्र पन्हाळे यांचा सत्कार केला. ओंकार सिताप, अमीर शेख, जब्बार सय्यद, सुहास लाटणे, बालाजी सिताप, योगेश चितारे, विकास यादव, निखिल जाधव, मंगेश कांबळे, राहुल पांढरे, हिरालाल खोमणे, विजय वाघमोडे, सागर वाघमोडे, अक्षय घोडके, प्रदीप कोकरे, विक्रम मोरे, आकाश खरात, गौतम वीर, विजय वीर, हनुमंत कारंडे, कबड्डी कोच अकबर शेख, रामदास शेलार, राष्ट्रीय खेळाडू आदम शेख, किरण मगर, रोहित मोहिते, सौरभ चव्हाण, अनिकेत वाघ, विलास भोसले, आनंदराव खुसपे, दिलीप पाटोळे, उमेश रसाळ, तानाजी कोकरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. प्रदीप कल्याणकर, अरुणा वाघमारे, श्रीराम अर्जुन यांचा सन्मान करण्यात आला.
सुहास डोंबाळे, रामचंद्र कदम, अंकुश रणमोडे, जय फडतरे, सागर मिसाळ, रामेश्वर माने, डॉ. संजीव लोंढे, अप्पासोा अर्जुन, सत्यवान केदार, योगेश डोंबाळे, राहुल अर्जुन, हरिश्चंद्र बंडगर, पिंटू डोंबाळे, दादासाहेब डोंबाळे, संतोष कदम, स्वप्निल मडके, नितीन मोहिते, अमोल चव्हाण उपस्थित होते. आयोजन कालिदास राऊत यांनी केले.