‘सीबीएसई’ परीक्षेत कल्पेश कृष्णा टॉपर

By Admin | Updated: May 27, 2014 07:04 IST2014-05-27T07:04:01+5:302014-05-27T07:04:01+5:30

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर झाला.

Kalpesh Krishna Topper in 'CBSE' exam | ‘सीबीएसई’ परीक्षेत कल्पेश कृष्णा टॉपर

‘सीबीएसई’ परीक्षेत कल्पेश कृष्णा टॉपर

पुणे : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकेंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलच्या कल्पेश कृष्णा या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याने सर्वाधिक ९८.२ टक्के गुण मिळवून टॉपर येण्याचा मान मिळविला आहे. आज दुपारी हा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. दरम्यान, देशातील टॉपर आणि राज्यातील सर्व आकडेवारी मंगळवारी जाहीर करणार आहे. यंदा देशभरातील विविध शाळांमधील सुमारे १० लाख २९ हजार ८७४ जणांनी सीबीएसईची ही परीक्षा दिली होती. त्यामध्ये ६ लाख ३ हजार ६४ विद्यार्थी आणि ४ लाख २६ हजार ८१० विद्यार्थिनींचा समावेश होता. या परीक्षेमध्ये पुण्यातील विविध शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी यश मिळविले. (प्रतिनिधी)

Web Title: Kalpesh Krishna Topper in 'CBSE' exam