शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना कला जीवनगौरव पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 1:15 PM

टिळक स्मारक मंदिरात रात्रभर कवितांची मैफल रंगणार

ठळक मुद्देखासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार

पुणे:  स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्यातर्फे प्रकाश ढेरे स्मृती प्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना शुक्रवारी जाहीर झाला. पंचवीस हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिरात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या कविसंमेलनात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ भाष्य कवी रामदास फुटाणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्यातर्फे ३३ वर्षांपासून कविसंमेलन आणि पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिरात रात्रभर कवितांची मैफल रंगणार असून जुन्या आणि नवोदित कवींच्या कविता ऐकण्याची संधी या कार्यक्रमातून साहित्य रसिकांना मिळणार आहे.यशोदाबाई केशवराव ढोरे स्मृती साहित्य पुरस्कार मंगेश नारायण काळे यांना मायावीये तहरीर या कवितासंग्रहासाठी, बाबासाहेब जाधव स्मृती साहित्य पुरस्कारह्ण संदीप जगदाळे यांना असो आता चाड या कवितासंग्रहासाठी आणि धनाजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार योगिनी राऊळ यांना मुखवटा उतरल्यावर या कवितासंग्रहासाठी देण्यात येणार आहे. अकरा हजार एक रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी उपस्थित राहणार आहेत. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रामदास फुटाणे करणार आहेत. पत्रकार परिषदेला संजय ढेरे व सुनील महाजन उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDilip Prabhavalkarदिलीप प्रभावळकर ramdas phutaneरामदास फुटाणे