केएसीएफ शूटिंग रेंजच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:48+5:302021-08-28T04:14:48+5:30

बारामती : बारामतीच्या कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित शूटिंग रेंजच्या नेमबाजांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळविले. गुजरात अहमदाबाद येथे ...

Of KACF shooting range | केएसीएफ शूटिंग रेंजच्या

केएसीएफ शूटिंग रेंजच्या

बारामती : बारामतीच्या कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित शूटिंग रेंजच्या नेमबाजांनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळविले.

गुजरात अहमदाबाद येथे झालेल्या ८ व्या उपराष्ट्रीय वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत फाउंडेशन संचलित शूटिंग रेंजच्या आदित्य मदने या नेमबाजाने १० मीटर पीप साईट एअर रायफल शूटिंग इव्हेंटमध्ये देदीप्यमान कामगिरी करून ३ रौप्य व १ कांस्य अशी चार पदके मिळविली. तसेच, सुहास कुंभार याची १० मीटर पीप साईट एअर रायफल शूटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. आरती मिरोखे यांची ५० मीटर स्मॉल बोअर रायफल ‘थ्रीपी ॲण्ड प्रोन’मध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. ही स्पर्धा ही नॅशनल राइफल असोसिएशन आॅफ इंडिया व गुजरात स्टेट राइफल असोसिएशन यांच्या वतीने नुकतीच पार पडली. या स्पर्धेत पाच राज्यांतून ६०० नेमबाजांनी सहभाग नोंदवला.

तर आदित्य मदने याने ज्युनिअर गटात, युथ गटात व सबयुथ गटात प्रत्येकी एकप्रमाणे ३ रौप्यपदके व सिनिअर पुरुष गटात १ कांस्यपदक मिळविले. केएसीएफ शूटिंग रेंजचे सचिव प्रशांत सातव यांनी आदित्य मदने याचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक आनंद बोराडे व केएसीएफ शूटिंग रेंजच्या प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाज आरती मिरोखे यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

आंतरराष्ट्रीय नेमबाज शिवानी प्रशांत सातव यांना बी.एम.सी.सी. महाविद्यालय पुणेतर्फे पिस्तूल शूटिंग क्षेत्रात केलेल्या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल शिवराम फळणीकर पुरस्कार शनिवारी (दि. २८) ज्येष्ठ बँकिंगतज्ज्ञ राज्यमंत्री विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यापुढील काळात पिस्तूल आणि रायफल शूटिंग प्रकारात अनेक खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याची संधी फाउंडेशन संचलित शूटिंग रेजच्या माध्यमातून मिळणार आहे. शूटिंगची आवड असणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे.

कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे यशस्वी नेमबाज.

२७०८२०२१ बारामती—०३

Web Title: Of KACF shooting range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.