शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

कबीरांचे दोहे मानवजातीला दिशा देणारे : डॉॅ. बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 19:06 IST

‘कबीर हा तसा बहिष्कृत संत होता...

ठळक मुद्देरतनलाल सोनग्रा यांना साहित्यदीप पुरस्कार

पुणे : ‘कबीर हा तसा बहिष्कृत संत होता. कारण, हिंदू त्याला आपला मानत नव्हते आणि मुस्लिम त्याला नाकारत होते. परंतु, कबीरांनी जे दोहे लिहिले, ते संपूर्ण मानवजातीला दिशा देणारे आहेत’, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले. प्रा. रतनलाल सोनग्रा यांना साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यदीप पुरस्काराने गौरवण्यात आले. गोवा विधानसभेचे उपसभापती शंभूभाऊ बांदेकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. बाबा आढाव, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्रा चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर आदी उपस्थित होते.सोनग्रा म्हणाले, ‘लेखकाने नुसते लिहून थांबायचे नसते, तर लेखनातून समतेचा विचार समाजाला दिला पाहिजे. अलीकडे पुरस्काराचे कारखाने निघाले आहेत. अशा वेळी कोणता पुरस्कार स्वीकारायचा आणि कोणता नाकारायचा, याचा सारासार विचार करता आला पाहिजे.’ डॉ. सप्तर्षी यांनी सोनग्रा यांच्यासह असलेल्या मैत्रीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.उत्तरार्धात सोनग्रा यांच्या साहित्यावर आधारित ‘सोनजातक’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्योत्स्रा चांदगुडे यांची संकल्पना असलेल्या कार्यक्रमाचे संहिता लेखन कविता क्षीरसागर यांचे होते. स्वाती सामक, धनंजय तडवळकर, माधव हुंडेकर, निरुपमा महाजन, अन्वी आठलेकर आणि कविता क्षीरसागर यांनी अभिवाचन केले. चंचल काळे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढाव