शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना न्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 17:51 IST

१९९७ साली जाधववाडी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने सिलिंग लावण्याचे धोरण निश्चित केले होते..

ठळक मुद्देराज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांनी मंगळवारी मुंबई मंत्रालय येथे याबाबत बैठक आयोजित सिलिंग रद्द करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश चाकण, येलवाडी, सांगुर्डी, खालूंब्रे या गावातील प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा

पुणे  : मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील शेतकऱ्यांना आता न्याय मिळाला असून १६०० हेक्टर पेक्षा अधिक जमिनीवरील सिलिंग रद्द ( लाभ क्षेत्रावरील शेरे वगळणे ) करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे मावळ तालुक्यातील इंदोरी, जांभवडे व खेड तालुक्यातील कान्हेवाडी तर्फे चाकण, येलवाडी, सांगुर्डी, खालूंब्रे या गावातील प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. १९९७ साली जाधववाडी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर शासनाने सिलिंग लावण्याचे धोरण निश्चित केले, त्यानंतर शेतकरी सातत्याने त्यांच्या हक्काच्या जमिनीवरचे सिलिंगचे शेरे रद्द करण्यासाठी प्रयत्न करत होते. 

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांनी मंगळवारी मुंबई मंत्रालय येथे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर, कृष्णा खोरे विभागाचे कार्यकारी संचालक जाधव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुणे भारत वाघमारे, अधिक्षक अभियंता चोपडे, ज्येष्ठ नेते संभाजीराव पवार, माजी सरपंच हेमलताताई मोरे, नवनाथ पवार, उमेश मोरे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अनेक  वर्षांपासून तेथील शेतकऱ्यांची ही मागणी होती. त्यास जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी या निर्णयाबद्दल दोन्ही मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.====================== 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीWaterपाणी