केवळ जय महाराष्ट्र म्हणून प्रगती हाेणार नाही : अनिल अवचट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 03:19 PM2018-05-20T15:19:58+5:302018-05-20T15:19:58+5:30

डाॅ. पार्वती पै रायतुरकर यांनी लिहिलेल्या गोवा दिसला तसा या पुस्तकाचे प्रकाश अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अापल्या मनाेगतात बाेलत हाेते.

just saying jay maharashtra will not make Maharashtra progressive: Anil Avchat | केवळ जय महाराष्ट्र म्हणून प्रगती हाेणार नाही : अनिल अवचट

केवळ जय महाराष्ट्र म्हणून प्रगती हाेणार नाही : अनिल अवचट

पुणे :  महाराष्ट्राबराेबरच इतर राज्यातील समाज अाणि सांस्कृतीक जीवनातील जे चांगले अाहे, ते अापण स्वीकारले पाहिजे. तरच अापली सर्वार्थाने प्रगती हाेईल. केवळ जय महाराष्ट्राच्या गर्जना करुन प्रगती हाेणार नाही, असे मत ज्येष्ठ लेखक अाणि विचारवंत अनिल अवचट यांनी व्यक्त केले. 
    प्रपंच बुक्सतर्फे प्रकाशित प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डाॅ. पार्वती पै रायतुरकर यांनी लिहिलेल्या गोवा दिसला तसा या पुस्तकाचे अवचट यांच्या हस्ते प्रकाशन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ज्ञ एम.पी तथा दादासाहेब बेंद्रे, प्रपंच बुक्स प्रकाशन संस्थेचे महेंद्र कानिटकर उपस्थित होते. 
    अनिल अवचट म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिका रायतुरकर यांनी गाेव्याच्या माहितीचा खजीना वाचकांसाठी उपलब्ध करुन दिला अाहे. त्याचबराेबर हे पुस्तक म्हणजे गाेव्याच्या संस्कृतीचे दस्तावजीकरण झाले अाहे. गोवा,पर्यटन, मासे, कला-संस्कृतीवर प्रकाश टाकणारे अनेक पुस्तक बाजाराच आहेत पंरतू लेखीकेचा संशोधनात्मक दृष्टीकोनामुळे या पुस्तकाला ग्रंथांचे स्वरुप प्राप्त झाले असून ते गोवेकरांसह गोव्याला पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. केवळ वेगळी एेतिहासीक पार्श्वभुमी लाभल्यामुळे गोवा जवळच असलेल्या सिंधूदुर्ग आणि रत्नागिरी पेक्षा स्वतःचे वेगळेपण जपून आहे. गोवा म्हणजे केवळ चैनीचे, माैजमजेचे राज्य असा जो गैरसमज झालेला आहे तो समज या ग्रंथाव्दारे पुसुन निघेल. गोवाचे यथार्थ वर्णन करावयाचे झाल्यास गोवा म्हणजे समृद्धिची जमलेला प्रयोगच आहे. 
    अध्यक्षीय मनाेगतात दादासाहेब बेंद्रे  म्हणाले, गोवा म्हणजे केवळ  मासे आणि फेणी नसून गोवा म्हणजे आनंदनगरी आहे. येणाऱ्या पिढीला गोवा कसा आहे हे समजून घ्यायचे झाल्यास या पुस्तकाशिवाय त्यांना गत्यंतर नाही.

Web Title: just saying jay maharashtra will not make Maharashtra progressive: Anil Avchat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.