शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तुला आज संपवतोच...! आंदेकर टोळीला बातम्या देण्याच्या संशयावरुन तरुणावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:51 IST

हवेत कोयते फिरवत केली दहशत निर्माण....

ठळक मुद्देओंकार कुडलेसह तिघांना अटक 

पुणे : गॅंगस्टर बंडु आंदेकर टोळीला बातम्या देतो, अशा संशयावरुन ओंकार कुडले व त्याच्या साथीदारांनी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. तसेच हवेत कोयते फिरवत दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी ओंकार कुडलेसह तिघांना अटक केली आहे.

राजन मंगशे काळभोर (वय २२, रा. मोहननगर, धनकवडी), ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. गणेश पेठ), कानिफनाथ विनोद महापूरे (वय २३, रा. डोके तालीम, नाना पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गोट्या माने, शुभम पवळे, आकाश सासवडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ओंकार कुडले याच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सूर्यकांत आंदेकर याला अटक केली आहे. ती घटना २१ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी डोके तालीमजवळ हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एका १६ वर्षाच्या मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र घराजवळ थांबलेले असताना ओंकार कुडले व इतर हातात कोयते घेऊन हवेत फिरवत दुचाकीवरुन ट्रिपलसिट आले. कानिफनाथ महापुरे याने हाच तो आद्या उंकरडे तुला आज आम्ही बघतोच, हा सुरज ठोंबरेच्या बातम्या आंदेकर टोळीला देऊन लावालाव्या करतो. तुला आज संपवतोच. सूरजभाऊ ठोंबरेनी याला संपवायला सांगितले आहे, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. तसेच इतरांनी हातातील कोयते हवेत उंचावून मोठ मोठ्याने सूरज भाई का राज आनेवाला है, असे ओरड व शिवीगाळ करीत लोकांच्या मनात दहशत निर्माण केली. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन आरोपी रहात असलेल्या ठिकाणी छापे घालून तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते अधिक तपास करीत आहेत. 

गुन्हेगार कायदा हातात घेईल तर कडक कारवाई

सूर्यकांत ऊर्फ बंडुआंदेकर, ओंकार कुडले याच्या अटकेविषयी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, अशा प्रकारे कोणी कायदा हातात घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असेल तर पोलिसांकडून स्वत: हून त्यांची माहिती काढून अशा गुन्हेगारांची  गय न करता त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व निरीक्षक हर्षवर्धन गाडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक