जुन्नरला स्वातंत्र्यदिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:18 IST2021-08-17T04:18:04+5:302021-08-17T04:18:04+5:30

स्वातंत्र्यदिनानिमित्त जुन्नरच्या शासकीय कार्यालयाना सजावट जुन्नर : ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जुन्नर शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना तिरंगी फुग्यांची सजावट ...

Junner in Independence Day excitement | जुन्नरला स्वातंत्र्यदिवस उत्साहात

जुन्नरला स्वातंत्र्यदिवस उत्साहात

स्वातंत्र्यदिनानिमित्त जुन्नरच्या शासकीय कार्यालयाना सजावट

जुन्नर : ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जुन्नर शहरातील सर्व शासकीय कार्यालयांना तिरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व जुन्नर महसूल विभागाच्या संकल्पनेतून हा उपक्रम करण्यात आला. जुन्नर पोलीस ठाणे, तहसीलदार कार्यालय, न्यायालय, उपविभागीय पोलीस कार्यालय, पोस्ट ऑफिस तसेच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दादाजी कोंडदेव पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हुतात्मा स्मारक आदी ठिकाणी लावण्यात आलेल्या या तिरंगी कमानी लक्षवेधी ठरल्या. स्वातंत्र्यदिनाच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही सजावट करण्यात आल्याचे प्रभारी तहसीलदार सचिन मुंढे व रोटरीचे प्रोजेक्ट प्रमुख सचिन ताथेड यांनी सांगितले. आमदार अतुल बेनके व मान्यवरांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सचिन मुंढे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

किल्ले शिवनेरीवर मंडल अधिकारी शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रवींद्र काजले यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: Junner in Independence Day excitement