जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

By Admin | Updated: September 17, 2015 02:36 IST2015-09-17T02:36:59+5:302015-09-17T02:36:59+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांच्या खांद्यावरून शिवसेनेने अचूक निशाणा साधला आणि सत्ताधारी संजय काळे यांच्या शिवनेर पॅनलचा दारुण पराभव केला. जुन्नर कृषी उत्पन्न

Junnar pushes the NCP into force | जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला जबर धक्का

जुन्नर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांच्या खांद्यावरून शिवसेनेने अचूक निशाणा साधला आणि सत्ताधारी संजय काळे यांच्या शिवनेर पॅनलचा दारुण पराभव केला. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने १९ पैकी १२ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. शिवनेर पॅनलला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपा पुरस्कृत शिवनेर सहकार परिवर्तन पॅनलला खातेही उघडता आले नाही.
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाल्याने बुधवारी निकालासाठी अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांनी एक होऊन शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान उभे केले. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना विजयी केले.
विजयानंतर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषी मिरवणूक काढली.
व्यापारी गटातून पहिला धक्कादायक निकाल मिळाला. व्यापारी मतदार संघातून शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे धनेश संचेती हे विजयी झाले; मात्र त्यांचेच सहकारी हरिभाऊ गुंजाळ यांना पराभव स्वीकारावा लागला. शिवनेर पॅनलचे नासीर मणियार हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन व्यापारी मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर मात्र शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने ग्रामपंचायत मतदार संघातून आपली घोडदौड कायम ठेवत सर्वच्या सर्व जागा पटकाविल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी केलेले बाजार
समितीचे विद्यमान उपसभापती धोंडिभाऊ पिंगट, विद्यमान संचालक रघुनाथ लेंडे, शिरीष बोऱ्हाडे, तर तिकीट वाटपातून डावललेले विद्यमान संचालक धनेश संचेती व निवृत्ती
काळे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवीत आपली जनमानसातील ताकद सिद्ध केली.
सोसायटी मतदार संघाच्या महिला राखीव गटात शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या हिराताई चव्हाण व सुमन बोऱ्हाडे यांनी, तर इतर मागासवर्गीय गटातून निवृत्ती काळे व एनटी गटातून विद्यमान उपसभापती यांनी बाजी मारली.
सोसायटी मतदार संघाच्या सर्वसाधारण गटात मात्र सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. विद्यमान सभापती संजय काळे यांनी सर्वाधिक ५११ मते घेऊन विजयी झाले; मात्र सहकाऱ्यांना आपल्यासोबत विजयी रांगेत ओढण्यास ते कमी पडले. शेतकरी विकास पॅनलचे महेंद्र मोजाड व शरद चौधरी यांचा अवघ्या मतांनी पराभव झाल्याने पॅनलच्या वरिष्ठ नेत्यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. ही मागणी निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे यांनी मान्य केली. (वार्ताहर)
- सविस्तर वृत्त पान ४

Web Title: Junnar pushes the NCP into force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.