हडपसर औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या कचरा प्रकल्पातील भंगाराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 14:03 IST2018-01-27T14:00:30+5:302018-01-27T14:03:12+5:30
हडपसर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेच्या कचरा रॅम्प प्रकल्पातील भंगाराच्या साहित्याला आज (दि. २७) सकाळी अकराच्या सुमारास आग लागली.

हडपसर औद्योगिक वसाहतीत महापालिकेच्या कचरा प्रकल्पातील भंगाराला आग
हडपसर : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या महानगरपालिकेच्या कचरा रॅम्प प्रकल्पातील भंगाराच्या साहित्याला आज (दि. २७) सकाळी अकराच्या सुमारास आग लागली.
येथे सुरू असलेल्या गॅस वेल्डिंगच्या मुळे ही आग लागली. येथून हाकेच्या अंतरावर अग्निशामक दलाचे केंद्र आहे. त्यामुळे काही मिनिटातच अग्निशामक दलाचे जवान तेथे आग विजवण्यासाठी पोहोचले.