शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

आता बोला! पिंपरी चिंचवडच्या जम्बो हाॅस्पिटलमध्ये रुग्ण नसताना ५८ रुग्णांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:27 IST

प्रशासनाच्या ऑक्सिजन ऑडिटमध्ये हाॅस्पिटल्सचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर..

पुणे : जिल्ह्यातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व खासगी व सरकारी हाॅस्पिटल्सचे ऑक्सिजन ऑडिट सुरू केले असून, यात ऑक्सिजनच्या विना वापराचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पिंपरी-चिंचवड मधील जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये तर 58 रुग्ण संख्याच्या एका ऑक्सिजन वाॅर्डमध्ये एकही रुग्ण नसताना ऑक्सिजन वापर मात्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शन्स सोबतच ऑक्सिजनची मागणी देखील मोठ्याप्रमाणात वाढली आहे. यामुळे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागवताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने उपलब्ध होणाऱ्या ऑक्सिजनचा काटेकोर वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग देशमुख यांनी प्रायोगिक तत्वावर काही खाजगी व काही सरकारी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट केले. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील आण्णा साहेब मगर स्टेडियम येथील जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये एकही रुग्ण नसताना तब्बल 58 रुग्ण संख्येच्या वाॅर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरू असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला असताना अशा प्रकारे बेफिकीरपणे वागणा-या ठेकेदारावर जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. -------खासगी हाॅस्पिटल्समध्ये अशी होते ऑक्सिजनचा गैरवापर बहुतेक सर्व लहान - मोठ्या हाॅस्पिटल्समध्ये रुग्णाला- गरजेपेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा दिला जातो- रुग्ण बाथरूमला गेल्यानंतर ऑक्सिजन चालुच असतो- रुग्ण जेवण करत असताना ऑक्सिजन चालुच ठेवला जातो - अनेक वेळा रात्री रुग्ण ऑक्सिजनचे मशिन बाजुला काढून झोपी जातात- ऑक्सिजनची फारशी गरज नसलेल्या रुग्णांना देखील ऑक्सिजन पुरवठा सुरूच ठेवणे -----------ऑक्सिजन संपल्याच्या बोगस काॅलमुळे प्रशासनाची धावपळ ऑक्सिजनचा पुरेसा साठा असतानादेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने आपल्याकडचा ऑक्सिजन पुरवठा संपल्याचा फोन काॅल जिल्हा प्रशासनाला केला. यामुळे पुण्याकडे निघालेला ऑक्सिजन टॅंकर पिंपरी-चिंचवडकडे वळविण्यात आला.

दरम्यान, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत संबंधित ऑक्सिजन पुरवठादाराला विचारणा केली असता पुरेसा ऑक्सिजन साठा शिल्लक असल्याचे सांगितले. तसा सविस्तर तपशील तातडीने व्हाॅटस् ॲप केलं. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अधिकाऱ्यांच्या अशा बेजबाबदारपणा बद्दल देखील नाराजी व्यक्त होत आहे. विभागीय आयुक्तांना या बद्दलचा अहवाल सादर केला जाणार असल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्तcollectorजिल्हाधिकारी