शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विनोदातील ‘ राजा ’ चे होणार स्मारक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 06:00 IST

निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील राजा ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले...

ठळक मुद्देकै. राजा गोसावी प्रतिष्ठानचा पुढाकारकलाकृती दाखविण्यासाठी मिनी थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार

- नम्रता फडणीस- पुणे : निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील राजा ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही राजा गोसावी नावाची जादू ओसरलेली नाही. आयुष्यभर प्रेक्षकांच्या चेह-यावर हसू उमटविणा-या या विनोदवीराच्या स्मृती आता कायमस्वरूपी जतन केल्या जाणार आहेत. कै. राजा गोसावी प्रतिष्ठानने राजा गोसावी यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.     सौजन्याची ऐशीतैशी ,करायला गेलो एक ,लग्नाची बेडी, डार्लिंग डार्लिंग यांसारख्या विविध व्यावसायिक नाटकांसह ह्णएकच प्याला,भावबंधन,संशयकल्लोळह यांसारखी संगीत नाटके तसेच  अवघाची संसार, आंधळा मागतो एक डोळा,लाखाची गोष्ट, हा खेळ सावल्यांचा अशा अनेक चित्रपटांमध्ये राजा गोसावी यांनी अभिनयाचे दर्शन घडविले. आजही त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी होतात. इतकी लोकप्रियता लाभलेल्या या प्रतिभावंत कलावंताचे स्मारक साता-यापासून दहा किलोमीटरवर असलेल्या लिंब या गावी करण्याचा प्रतिष्ठानने निर्णय घेतला आहे. लिंब मधील गौरीशंकर कॉलेजच्या मागची जागा प्रतिष्ठानने शासनाकडे मागितली. यास शासनाने हिरवा कंदिल दिल्याची माहिती कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश गोसावी यांनी ह्यलोकमतह्णला दिली.     ते म्हणाले, या स्मारकात राजा गोसावी यांच्या नाटक , चित्रपटांचे स्वतंत्र कलादालन, त्यांच्या कलाकृती दाखविण्यासाठी मिनी थिएटरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. मात्र केवळ स्मारकापुरतेच याचे स्वरूप मर्यादित न ठेवता तरूण पिढीसाठी अभिनयाच्या कार्यशाळांवर अधिक प्रमाणात भर दिला जाणार आहे. जुन्या कलाकारांच्या अभिनयाचा अभ्यास नव्या पिढीने करावा हा कार्यशाळा घेण्यामागचा हेतू आहे. पूर्वी फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये विनोद हा विषय अभ्यासक्रमाला होता. राजा गोसावी यांची नाटके, चित्रपट आवर्जून पाहा असे सांगितले जायचे. हे स्वत: अभिनेते असरानी यांनी आम्हाला सांगितले होते. ज्येष्ठ कलाकारांचा अभिनय आज तरूण पिढीला पाहायला मिळत नाही. मात्र जुन्या कलाकारांची नावे आजही लोकांच्या स्मरणात आहेत. राजा गोसावी यांचा सहजसुंदर अभिनय, त्यांची विनोदाची पद्धत कार्यशाळेमधून य शिकविली जाणार आहे. मेकअप, वेशभूषा आदी चित्रपटाशी निगडित विविध कलांचे ज्ञानही युवा पिढीला देणार आहोत. 

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाJokesविनोद