शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

JNU Protest : जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ छेडलेल्या आंदोलनाचा ’एफटीआयआय’ला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 3:45 PM

JNU Protest : संस्थेमध्ये ‘पिफ’ चा एकही कार्यक्रम होणार नाही

ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या निर्मिती तसेच एफटीआयआयला साठ वर्षे पूर्ण सुसज्ज थिएटर नसल्याने तसेच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याने फटका

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या यंदाच्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त संस्था पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झाली असली तरी हा सहभाग आता काहीसा ‘नावापुरताच’ राहिला आहे. सुरुवातीला भारतीय चित्रपट कलानिर्मितीचे महत्वपूर्ण व्यासपीठ असलेल्या या संस्थेमध्ये उद्घाटन सोहळा आणि काही विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र, शुल्कवाढी विरोधात विद्यार्थ्यांनी केलेले उपोषण आणि नंतर जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ छेडलेले आंदोलन यामुळे संस्थेमध्ये होणारे सर्व कार्यक्रम इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. आता एफटीआयआयमध्ये एकही कार्यक्रम होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने १८ वा ‘पिफ’ ९ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ’महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ ही यंदाच्या ‘पिफ’ची संकल्पना आहे. महाराष्ट्राच्या निर्मिती तसेच एफटीआयआयला साठ वर्षे होत आहेत. याचे औचित्य साधत यंदा प्रथमच ‘एफटीआयआय’ ही संस्था पिफच्या आयोजनात सहभागी झाली आहे. सुरुवातीला ‘पिफ’चे उद्घाटन एफटीआयआयमध्ये दिमाखदार मांडव थाटून केले जाईल. तसेच, ‘पिफ फोरम’मधील व्याख्यान व कार्यशाळा असे कार्यक्रम आणि पत्रकार परिषदादेखील एफटीआयआयमध्ये होतील, असे पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केले होते. मात्र, एफटीआयआयमध्ये सुसज्ज थिएटर नसल्याने तसेच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याने त्याचा फटका संस्थेतील सर्व कार्यक्रमांना बसला आहे. सर्व कार्यक्रम इतर ठिकाणी हलविण्यात आले असून, केवळ ज्युरींचा सहभाग, कार्यशाळा यामाध्यमातूनच आता एफटीआयआय पिफमध्ये सहभागी होणार आहे.एफटीआयआयमध्ये एकही चित्रपट दाखवला जाणार नसून, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), बंड गार्डन रस्त्यावरील आयनॉक्स आणि सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर पॅव्हेलियन यापैकी मुख्य केंद्र कोणते हा प्रश्न निर्माण झाला आहे. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (९ जानेवारी)  सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे. या वेळी दिग्दर्शक आणि एफटीआयआयचे अध्यक्ष बी. पी. सिंग, अभिनेते विक्रम गोखले आणि संगीतकार उषा खन्ना यांना पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे. या कार्यक्रमानंतर जुआन होजे कँपानेला दिग्दर्शित ‘द विझल्स टेल’ हा अर्जेंटिनाचा चित्रपट महोत्सवाची ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून लॉ कॉलेज रस्ता व कोथरूड येथील एनएफएआयमध्ये दाखविला जाणारा आहे..........’पिफ’मध्ये ज्युरी आणि काही कार्यशाळांच्या माध्यमातून एफटीआयआयचा सहभाग असेल. बाकी एकही कार्यक्रम एफटीआयआयमध्ये होणार नाही. मात्र, त्याचे कारण सांगू शकत नाही.- भूपेंद्र कँथोला, संचालक, एफटीआयआय.

.............

एफटीआयआय संस्थेचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. संस्थेमध्ये ‘प्रभात’ स्टुडिओची वास्तू आहे. संस्थेला कलेचा खूप मोठा वारसा आहे. ‘पिफ’मध्ये एफटीआयआय सहभागी झाली याचा विशेष आनंद देखील आहे. या संस्थेचा मी सहा वर्षे उपाध्यक्ष राहिलो आहे. त्यामुळे मला विद्यार्थ्यांचे प्रश्न कळतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसंदर्भात तसेच सामाजिक व राजकीय घटनांबद्दल व्यक्त होऊ दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याने

एफटीआयआयमध्ये होणारे कार्यक्रम इतर ठिकाणी घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. परंतु, कार्यक्रमांमध्ये काटछाट केलेली नाही. केवळ ठिकाण बदलले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन करून महोत्सवात सहभागी व्हावे. पत्रकार परिषदा चित्रपट संग्रहालयाच्या कॉंफरन्स हॉलमध्ये होतील. पुरस्कार विजेत्या कलाकारांशी डेक्कन रँदेव्यू आणि पीव्हीआर येथे संवादाचे कार्यक्रम होतील. तसेच, सर्व व्याख्याने व संवादाचे कार्यक्रम पीव्हीआरमध्ये होती  -डॉ. जब्बार पटेल, संचालक, पिफ

टॅग्स :jnu attackजेएनयूShort Filmsशॉर्ट फिल्मPIFFपीफFTIIएफटीआयआय