शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खडकीत कमी कॅरेटचे दागिने देणाऱ्या सोनारांची चोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 16:00 IST

सावधान..! सोने घेताय तुमची फसवणूक तर होत नाहीये ना.. कारण असाच प्रकार खडकीत उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देदोघा सोनारांवर गुन्हा दाखल ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या खडकी बाजारमधील ज्वेलर्सचा हो गोरख धंदा उघड

पुणे : तुमच्या गळ्यातील नेकलेस चांगला आहे़. किती कॅरेटचा आहे असे प्रश्न एखाद्या महिलेला केला तर त्या महिलेला आपण घेतलेला सोन्याचा दागिना हा नेमका किती कॅरेटचा आहे हे सांगता येत नाही़. ज्वेलर्स सांगतात ते नक्की खरे आहे का?, आपली फसवणूक तर होत नाही ना? अशा अनेक शंका नागरिकांना सोन्याचे दागिने घेताना येत असतात़. पण, त्याची खात्री नेमकी कोठे करायची याची माहिती नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येते़. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या खडकी बाजारमधील मॉडर्न ज्वेलर्सचा हो गोरख धंदा उघड झाला आहे़. खडकीपोलिसांनी खडकी बाजारमधील मॉडर्न ज्वेलर्स चे निलेश शांतीलाल जैन आणि कमलेश शांतीलाल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी अक्षय अनंत शिंदे (वय २९, रा़ जुना बाजार, खडकी) यांनी पुणे शहर युवक काँग्रेस आणि खडकी कँट्रोंमेंट ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष शिंदे यांनी मॉडर्न ज्वेलर्समधून आपल्या वडिलांसाठी २४ जुलै रोजी सोन्याची अंगठी खरेदी केली होती़. त्यावेळी सोनारांनी ती २३ कॅरेटची असल्याचे सांगितले होते़. घरी जाऊन इतरांना दाखविली तेव्हा त्यांना त्यातील सोन्याविषयी शंका आल्या़. शिंदे यांनी पुण्यातील शुक्रवार पेठेतील एका ज्वेलर्सच्या कारखान्यातून ती तपासून घेतली़. तेव्हा ही अंगठी २३ कॅरेटची नसून केवळ १६़७१ कॅरेटची असल्याचे आढळून आले़. या कारखान्याने दिलेला तपासणीचा अहवाल घेऊन त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे़. पोलिसांनी ज्वेलर्सवर गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक एम़ एम़ कांबळे अधिक तपास करीत आहेत़. 

टॅग्स :KhadkiखडकीjewelleryदागिनेGoldसोनंCrimeगुन्हाPoliceपोलिस