शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी; पोलीसांचा कडक बंदोबस्त, २० ठिकाणी पार्किंगची व्यवस्था

By श्रीकिशन काळे | Updated: August 11, 2024 12:34 IST

राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील जनजागृती शांतता फेरी काढत असून पुण्यातून सारसबागेतून फेरीला सुरुवात होणार

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज (दि.११) सारसबागेसमोरून शांतता रॅली निघणार आहे. ही रॅली सारसबागेपासून बाजीराव रोडने जंगली महाराज रस्त्यावरून डेक्कनला पोचेल. त्यामुळे या सर्व ठिकाणी जरांगे पाटील यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त देखील ठेवला आहे.

राज्यामध्ये सर्वत्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) जरांगे पाटील जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. शनिवारी (दि.१०) सोलापूर आणि सांगली येथे रॅली झाली. त्यानंतर आज (दि.११) ही फेरी पुण्यात दाखल होत आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. सारसबागेच्या चौकातही मोठमोठे फलक लावले असून, भगवे झेंडे पहायला मिळत आहेत. तसेच डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याभोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मराठा बांधव हळूहळू सारसबागेसमोर जमा होत आहेत.

शांतता रॅलीत सहभागी होणाऱ्यांसाठी सूचना 

1) रस्त्यावरून जाताना आणि येताना शांततेने यायचे आहे.2) कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या विरोधात घोषणा देऊ नयेत.3) रॅलीमध्ये आपले वर्तन शब्द आणि आदर्श असावे. 4) वाहने चालवताना काळजी घ्यावी. रॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होणार नाही याब‌द्दल दक्षता घ्यावी.5) वाहने पार्किंगमध्ये लावून सारसबाग येथून रॅलीमध्ये चालत सामील व्हायचे आहे6) रॅलीमध्ये कोणत्याही वाहनास परवानगी असणार नाही7)  जरांगे पाटील यांच्या गाडीच्या पुढे संपूर्ण महिलांचा जमाव चालणार आहे आणि गाडीच्या पाठीमागे पुरुषांचा जमाव चालणार आहे.

शांतता रॅलीत येणाऱ्या वाहनास पार्किंग व्यवस्था 

1. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे अरण्येश्वर कॅम्पसचे मैदान2. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे शुक्रवार पेठ मामलेदार कचेरी समोरील लेनमधील मैदान3. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड ग्राउंड4. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलचे रमणबाग शाळेचे  मैदान5. AISSMS संस्थेचे RTO ऑफिस शेजारील ग्राउंड6. फर्ग्युसन कॉलेज ग्राउंड7. वीर नेताजी पालकर वि‌द्यालय शिवाजीनगर पोलीस लाईन8. क्रीडा निकेतन दत्तवाडी9. लालबहादूर शास्त्री प्राथमिक वि‌द्यालय रोकडोबा मंदिर शेजारी शिवाजीनगर10. प्राथमिक विद्यालय महात्मा फुले पेठ11. धर्मवीर संभाजी प्राथमिक विद्यालय नवी पेठ, शाळा क्रमांक 67 घोरपडे पेठ12. स. गो. बर्वे विद्यालय रास्ता पेठ, शाळा क्रमांक 9 नाना पेठ13. सरदार कान्होजी आंग्रे प्राथमिक विद्यालय शुक्रवार पेठ14. संत रामदास प्राथमिक वि‌द्यालय वडारवाडी हेल्थ कॅम्प15. हुतात्मा बाबू गेणू प्राथमिक विद्यालय बिबेवेवाडी16. मनपा ग्राउंड प्राथमिक विद्यालय शेतकी वि‌द्यापीठ आवार17. वि. स. खांडेकर प्राथमिक विद्यालय सहकार नगर18. भिडे पुलाशेजारील नदीपात्र19. मॉडर्न मुलांची शाळा शिवाजीनगर ग्राउंड20.मॅाडर्न इंजिनिअरींग कॅालेजचे पार्किंगइत्यादी ठिकाणे पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तसेच ज्या बांधवांना शक्य असेल त्यांनी मेट्रोचा आणि लोकलचा वापर करावा, असे आवाहन पुणे जिल्हा सर्व मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती