शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

"मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये"; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 18:37 IST

जयंत पाटील यांनी केलेल्या एका विधानाची मागील तीन-चार दिवसांपासून चर्चा होत आहे. पक्षांतराच्या अनुषंगाने होत असलेल्या चर्चेवर त्यांनी आज पडदा टाकला. 

शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीचे आझाद मैदानात आंदोलन सुरू असून, या आंदोलनात बोलताना जयंत पाटलांनी एक विधान केले. राजू शेट्टींना उद्देशून केल्या गेलेल्या या विधानाचे राजकीय अर्थ काढले गेले. त्याला सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी फोडणी दिली. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चेला आणखी हवा मिळाली. पण, या सगळ्यावर स्वतः जयंत पाटलांनी पडदा टाकला. माझं काही खरं नाही, या विधानाबद्दल त्यांनी सविस्तर खुलासा केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

जयंत पाटील यांनी आज काही लोकांसोबत शरद पवारांची भेट घेतली. बारामती येथे माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भूमिका मांडली. नाराज असल्याच्या चर्चांबद्दल पाटील म्हणाले, "नाराजी वगैरे काही नाहीये. कसं आहे की माझी बोलायचीच चोरी झाली आहे. मी भाषण केलेलं, त्याचा संदर्भ तुम्ही काढून बघा. शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला, त्यांच्यासमोर भाषण केलं."

जयंंत पाटील 'माझं काही खरं नाही' का म्हणाले?

"मी त्यांना सांगितलं की, कालांतराने मोबदला वाढून मिळालं की, नुकसानभरपाई घेतात आणि गप्प बसतात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का? तुम्ही ठाम आहात का? तुम्ही शेवटपर्यंत नेणार आहात का? राजू शेट्टी हा झेंडा हातात घेतलाय म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही. तो विनोदाचा भाग होता की, राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही. आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो. त्यामुळे माझं काही तुम्ही गृहीत धरू नका. खरं धरू नका. तुमचं आंदोलन सुरू ठेवा, त्याला आमचा पाठींबा आहे, अशी ते बोलण्याची भावना होती", असा भूमिका जयंत पाटलांनी 'माझं काही खरं नाही', या विधानाबद्दल मांडली. 

मला कुठेतरी ढकलायचंच ठरवलेलं दिसतंय

"मी नाराज आहे पासून ते पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली. याचं स्पष्टीकरण आझाद मैदानातून विधान भवनात आल्यावर दिलं होतं. सगळ्या प्रसार माध्यमांनी ठरवलेलं दिसतंय की, मला काही करून कुठेतरी", असे मिश्कील विधानही पाटलांनी याबद्दल बोलताना केलं. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपाSharad Pawarशरद पवार