शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

"जयंत पाटलांच्या कानावर खेडचं प्रकरण घातलं होतं, पण त्यांनी काहीच केलं नाही.."; संजय राऊतांचा टीकेचा बाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 18:10 IST

पुणे जिल्ह्यातील खेड येथील पंचायत समितीतील फोडाफोडीच्या राजकारणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

पुणे : राज्यात एकत्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मात्र खेडमधील फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी पुन्हा एकदा पुण्यात खेड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राज्यात आपण एकत्र असून समन्वयाने महाविकास आघाडी सरकार सुरु आहे. मात्र, याच दरम्यान खेडमध्ये असा प्रकार होणे योग्य नाही. हे प्रकरण पहिल्यांदा जयंत पाटलांना सांगितले होते. पण त्यांनी काहीच केले नाही. आता अजित पवारांनी तरी या प्रकरणात लक्ष घालावे अशी आमची अपेक्षा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरूनगर येथील पंचायत समितीतील राजकारण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फोडाफोडीच्या राजकारणावरून चांगलीच जुंपली आहे. हा स्थानिक पातळीवरचा वाद अगदी वरिष्ठांपर्यंत पोहचला आहे. याचवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून थेट खेड गाठले. आणि याबाबतीत त्यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत थेट अजित पवारांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली. 

राऊत म्हणाले, खेड पंचायत समितीच्या सभापतींवर आलेला अविश्वास ठराव हा सरळसरळ शिवसेनेवर अन्याय आहे. सेनेचे सदस्य पळवून नेणं फोडणं हे कोणी आमिष दाखवलं? ज्यांच्याबरोबर गेले त्यांनी दाखवलं.कि अन्य कुणी ? अशी संधी आम्हांलाही मिळु शकते. पण आम्ही त्यांना त्यांच्या सरकारला समजावायला सांगू. या प्रकरणाचे आम्ही शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यापैकी कोणावरही खापर फोडलेले नाही. फक्त अजित पवारांनी या प्रकरणी लक्ष घालावे एवढीच आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्याना आम्ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणतो. 

काय आहे प्रकरण ? खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात दाखल केेलेला अविश्वास ठराव अकरा विरुध्द तीन अशा मतांनी मंजूर झाला .२४ मे ला सभापतीविरूध्द शिवसेनेच्या सहा सदस्यांनी बंड पुकारून हा अविश्वास ठराव दाखल केला होता. त्याला राष्ट्रवादी व भाजप सदस्यांनी साथ दिली.मात्र या बंडखोर सदस्यांना राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहितेपाटील यांची फूस असल्याची चर्चा आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे.  

अजितदादा तुमच्या आमदाराला वेसन घाला ... खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी ते लायकीचे नाही. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. आम्ही देखील फोडाफोडीचे राजकारण करून शकतो. पण आमचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे अजितदादा तुमच्या आमदाराला वेसन घाला नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो खेडमध्ये राष्ट्रवादीचा आमदार पाडून इथे शिवसेनेचाच आमदार असेल अशा शब्दात गर्भित इशारा दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवार