शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जॅमर चोरताय... थांबा, होऊ शकतो ३ वर्षे तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 02:50 IST

नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास कारवाई : मात्र, वाहनचालक जॅमरसह जातात पळून

पुणे : नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केल्यांवर किंवा वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन केल्याने वाहनांना जॅमर लावले जात आहे. मात्र, सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे जॅमर चोरीच्या गेल्या वर्षभरात अनेक घटना घटल्याची माहिती समोर आली आहे, असा गुन्हा करणाऱ्यास कायद्यानुसार तीन वर्षे तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होवू शकते.

शहरातील वाहतूक प्रश्न वाढतच चालल्याने कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. नियम तोडल्यास वाहन चालकांना दंड करून सोडून देण्यात येते. तर वाहने नो पार्किंगमध्ये लावली असतील तर दुचाकी टोर्इंगद्वारे संबंधित पोलीस स्टेशनला नेण्यात येतात. चारचाकी वाहन असेल तर तिला जागेवरच जॅमर लावून लॉक केले जाते. मात्र, बेशिस्त वाहनचालक नो पार्किंगचा दंड टळावा म्हणून जॅमर लावलेले चाक खोलून त्या जागी स्टेपनी लावून फरार होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, हे सर्व करीत असताना २०० रुपयांचा दंड टाळण्यासाठी ते जॅमर चोरीसारखा गंभीर गुन्हा करीत आहेत. असा प्रकार उघड झाल्यास पोलीस संबंधित वाहन चालकांवर भारतींय दंड संविधान कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करीत आहे. गुन्हा सिद्ध झाला तर तीन वर्षे तुरुंगवास होवू शकतो.असा चोरला जातोय जॅमरजॅमर लावल्याने गाडी घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहन चालक जॅमर लावलेला टायर बदली करून त्या जागी स्टेपनी बसवतात. तसेच गाडी पुढे घेतली तर जॅमरवर लोड येऊन तो वाकला जातो. वाकलेले जॅमर अलगद काढता येतो.एका जॅमरची किंमत एक हजार रुपयेच्टोर्इंग व्हॅनवरील जॅमर चोरीला गेल्याने त्यांची संख्याही कमी झाली आहे. एका जॅमरची किंमत साधारण १ हजार रुपये असते.च्तो चोरीला गेल्याने पोलिसांना दंडही वसूल करता येत नाही. त्यामुळे जॅमर चोरी आणि दंड न मिळाल्याचा दुहेरी फटका पोलिसांना बसत आहे.जॅमर चोरणाºया वाहनचालकांवर चोरीचा गुन्हा दाखल केला जात आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी स्वत:ला गुन्हेगार बनवायचे का, याचा विचार अशा बाबी करणाºया व्यक्तींनी करावा. त्यातील अनेकांना तर माहिती पण नसते की आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा काय आहे.- तेजस्वी सातपुते, उपायुक्त वाहतूक शाखा

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस