शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जनशक्ती धनशक्तीचा पराभव करणार : पँथर संघटनेचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 15:40 IST

कॉंग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपाचे गिरीश बापट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

ठळक मुद्देकॉंग्रेस-भाजपाचे कार्यकर्ते आमच्यासोबतच पुणे, शिरुर, उस्मानाबाद, सोलापूर या चार मतदार संघांमध्ये वंचितला पाठिंबा लवकरच आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या सभा पुण्यात होणार

पुणे : पुरोगामी संघटनांमध्ये कॉंग्रेसला पाठिंबा द्यायचा की वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यायचा याविषयी संभ्रम असल्याचे सांगितले जात आहे. परंतू, कॉंग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपाचे गिरीश बापट एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरोगामी संघटना वंचित आघाडीलाच समर्थन देतील. या निवडणुकीत जनशक्ती धनशक्तीचा पराभव करणार असल्याचा विश्वास उमेदवार अनिल जाधव यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीला पँथर संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय नडगेरी, उत्तम बनसोडे, जालिंदर वाघमारे आदी उपस्थित होते. संघटनेने पुणे, शिरुर, उस्मानाबाद, सोलापूर या चार मतदार संघांमध्ये वंचितला पाठिंबा दिल्याचे यावेळी नडगेरी यांनी सांगितले. पँथरच्या जेथे जेथे शाखा आहेत त्या ठिकाणी, तसेच दलित, मुस्लिम बहुल भागात प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचेही नडगेरी यांनी स्पष्ट केले. पँथरचा पाठिंबा मिळणे हा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या विचारांना मिळालेली ताकद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार घेऊन वंचित आघाडी निवडणुकीत उतरली असून दलित-उपेक्षितांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे चळवळीतील संस्था-संघटनांनी साथ देणे आवश्यक आहे. सर्वजण एकत्र होऊन लढलो तर ती डॉ. आंबेडकरांना खरी आदरांजली ठरेल असे जाधव यावेळी म्हणाले. लवकरच आंबेडकर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या सभा पुण्यात होणार आहे. ====एकेकाळी उपेक्षित आणि कष्टकरी वर्गातील कार्यकर्ते कॉंग्रेस आणि भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रचार करायचे. मात्र, तेच कार्यकर्ते आज वंचित बहुजन आघाडीसोबत असून त्यांच्या मनामध्ये प्रस्थापितांविरुद्ध रोष वाढत चालला आहे. कॉंग्रेसचे मोहन जोशी आणि भाजपाचे गिरीश बापट हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरोगामी संघटनांना एकत्र घेऊन धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा आवाज बुलंद करण्याचा आमचा प्रयत्न आहे. - अनिल जाधव, उमेदवार, वंचित आघाडी 

टॅग्स :PuneपुणेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक