शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सरहद संस्थेच्या वतीने जम्मू-काश्मीर सांस्कृतिक, चित्रपट महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 7:16 PM

जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते.

ठळक मुद्देकाश्मीरविषयी अथवा काश्मीरी कलाकारांचा सहभाग असणारे चित्रपट यात दाखवले जाणार

पुणे : जम्मू-काश्मीरचे सांस्कृतिक संचित, परंपरा, तसेच चित्रपटांमधून होणारे तेथील सामाजिक, राजकीय परिस्थितीचे वर्णन याबद्दल सामान्यांना कमालीचे कुतूहल असते. सामान्यांना याबाबत विविध बाबी जाणून घेण्याच्या उद्देशाने सरहदच्या वतीने यंदाच्या वर्षी जम्मू काश्मीर सांस्कृतिक महोत्सव तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.जम्मू काश्मीर सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात १९९७ साली झाली. मधल्या काळात ताणतणावाच्या परिस्थितीमुळे तेथील कलाकार उपस्थित राहू शकले नव्हते. यंदाचा काश्मीर महोत्सव सरहद आणि अर्हम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, ‘बाँडिंग विथ काश्मीर’ अशी महोत्सवाची कल्पना आहे. ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी ४ वाजता महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. ज्यांनी हिंसाचार पाहिला, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती दहशतवादी हल्लयात मारल्या गेल्या, अशा तरुणांच्या ‘गाश बँड’चे सादरीकरण होणार आहे. आएएसमध्ये प्रथम येऊनही ज्याने प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन सामाजिक-राजकीय क्षेत्रात येण्याचा निश्चय केला, ज्याच्या वडिलांना अतिरेक्यांनी ठार मारले, अशा डॉ. शाह फैजल या तरुणाची महोत्सवास विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी तो भविष्यातील भूमिकाही स्पष्ट करणार आहे.--------आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसरहदच्या वतीने जम्मू काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. एफटीआयआय आणि एनएफएआय यांच्या सहकार्याने महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काश्मीरविषयी अथवा काश्मीरी कलाकारांचा सहभाग असणारे चित्रपट यात दाखवले जाणार आहेत. एनएफ एआयमध्ये होणा-या या महोत्सवासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल सतपाल मलिक, राज्यपालांचे सल्लागार खुर्शिद अहमद गनाई, काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स उभारणारे विजय धर, तसेच विविध चित्रपट निर्माते, कलाकार यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि महोत्सवाचे संचालक मुश्ताक अली यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाJammu Kashmirजम्मू-काश्मीर