मोबाईल बंदीलाच 'जॅमर'

By Admin | Updated: May 9, 2014 09:03 IST2014-05-09T09:03:27+5:302014-05-09T09:03:27+5:30

येरवडा कारागृहामध्ये मोबाईल जॅमर बसविण्याची गृहराज्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून वर्ष उलटले, तरी अद्याप ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही.

'Jammer' ban on mobile phones | मोबाईल बंदीलाच 'जॅमर'

मोबाईल बंदीलाच 'जॅमर'

दिपक जाधव, पुणे

येरवडा कारागृहामध्ये मोबाईल जॅमर बसविण्याची गृहराज्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून वर्ष उलटले, तरी अद्याप ती यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्याचा चांगलाच फायदा उठवीत कारागृहाची अभेद्य सुरक्षा यंत्रणा भेदून कैद्यांकडून मोबाईल आतमध्ये नेण्याचे प्रकार घडत आहेत.
येरवडा कारागृहातील अतीसुरक्षा विभागामध्ये (अंडासेल) एका सराईत गुन्हेगाराच्या तपासणीमध्ये त्याच्याकडे मोबाइल आढळून आल्याचे 'लोकमत'ने उजेडात आणले. कतिल सिद्दीकीचा येरवडा कारागृहामध्ये खून झाल्यानंतर कारागृहामध्ये मोबाइल जॅम
र बसविण्याचा विषय चर्चेत आला. विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना १८ मार्च २0१३ रोजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कारागृहांत मोबाइल जॅमर बसविणार असल्याची माहिती दिली होती.
गुन्हेगारांच्या टोळयांचे म्होरके कारागृहामध्ये बसून टोळीची सुत्रे हलवित असल्याचे अनेकदा उजेडात आले आहे. साथीदारांशी संपर्क साधण्याकरिता ते अनेक मार्गांचा अवलंब करतात. कारागृहातील तुरूंगाधिकारी, तुरूंगरक्षक यांच्या मोबाइलवरूनही कैदी साथीदारांशी संपर्क साधत असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारागृहांमध्ये मोबाइल जॅमर बसविणे गरजेचे आहे. कर्मचारी मॅनेज झाल्याची शक्यता
येरवडा कारागृहातील सुरक्षा यंत्रणा भेदून कपडयांमध्ये मोबाइल लपवून अंडासेलपर्यंत नेणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारागृहाच्या कर्मचार्‍यांना मॅनेज करूनच मोबाइल आतमध्ये नेण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींचा शोध कारागृह प्रशासन घेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येरवडा पोलिसांकडून चौकशी सुरू 
येरवडा कारागृहातील कैदी मुन्ना शेख याच्याकडे मोबाइल आढळून आल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध भादंवि कलम १८८ अन्वये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून मोबाइल हस्तगत केल्यानंतर त्याने तुरूंगरक्षकांना धमकविल्याचेही स्पष्ट झाले आहे. सहायक निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करीत आहेत. याप्रकरणी लवकरच त्याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केले जाण्याची शक्यता आहे. येरवडा कारागृहातील अनेक गैरप्रकार उजेडात येत आहेत, याचपार्श्‍वभुमीवर अतीसुरक्षा विभागात (अंडासेल) कैद्याकडे मोबाइल सापडण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. यासंपूर्ण प्रकरणाची नवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी राज्याचे प्रधान गृहसचिव अमिताभ राजन यांच्याकडे लिगल राइट सोसायटीचे अध्यक्ष अनुप अवस्थी यांनी केली आहे.

Web Title: 'Jammer' ban on mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.