शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Video: जय श्री केदार! हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून; बारामतीचे २ तरुण केदारनाथच्या चरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 17:15 IST

केदारनाथ मंदिर परिसरात सायकलवर आल्यावर या तरुणांना अक्षरशः डोळ्यातून पाणी आले

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे येथील उत्साही दोन तरुणांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवर करुन केदारनाथ गाठले. त्यांच्या या जिद्दीचे ग्रामस्थांसह बारामती लोकसभा मतदार संघातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर त्यांचा हा प्रवास इथेच थांबत नसून पुढे नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिराकडे होणार आहे.         सुपे येथील विलास वाघचौरे आणि देऊळगाव रसाळ येथील रोहित लोंढे या दोन तरुणांनी २३ जुनला केदारनाथकडे सायकलवर प्रवासाला सुरुवात केली. तब्बल २६ ते २७ दिवसात त्यांनी केदारनाथ मंदिर गाठले. यावेळी केदारनाथ मंदिर परिसरात सायकलवर आल्यावर या तरुणांना अक्षरशः डोळ्यातून पाणी आले. काहींना जिवनात येऊन एकदाही  केदारनाथ होत नाही. तर यांनी सायकलवर केलेला प्रवास हा थक्क करणारा आहे. या दरम्यान विलासने घरातून घेतलेले ५० रुपयांची नोट अद्याप तशीच जपुन ठेवली आहे. या प्रवासादरम्यान सुरुवातीला बारामती सायकल क्लबच्यामाध्यमातुन सायकल, टि शर्ट आणि पंक्चर साहित्य देण्यात आले. तसेच प्रवासात माहिती असणाऱ्या व्यक्तींनी गुगल आणि फोन पे यावरुन पाठवलेल्या पैशावरच हा प्रवास खर्च केल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. 

 केदारानाथ दरम्यान हरिद्वार, उज्जैन, ऋषिकेश, धारिवाली आणि गुप्तकाशी हा प्रवास २ हजार किलोमीटरचा झाला. तर आत्ता केदारनाथ करुन बद्रिनाथ व पुढे नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिराकडे जाणार आहे. यापुढील हा प्रवास आकराशे किलोमीटरचा असणार आहे. तर परतीच्या प्रवासात गुजरात मधील सोमनाथ मंदिराचे दर्शन करुन येण्याचा मानस असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. या प्रवासात राहण्याची व जेवणाची कुठेच अडचण आली नाही. राहण्यासाठी शक्यतो मंदिर, धर्मशाळा तर जेवणासाठी मंदिरातील तसेच जाताना कोणता कार्यक्रम असेल तर तिथेच जेवणाचा ताव मारायचा असे ठरलेले होते. त्यामुळे अडचण आली नाही. हरियाणामध्ये मंदिरात जेवण नव्हते तर शेजारी असणाऱ्या नागरिकांनी गरमागरम जेवण तयार करुन दिले. 

टॅग्स :PuneपुणेKedarnathकेदारनाथBaramatiबारामतीHealthआरोग्यCyclingसायकलिंग