शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 17:37 IST

खेड-आळंदी विधानसभा आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजपात प्रवेश

आळंदी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी अखेर उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ५ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राम गावडे यांच्यासोबत त्यांचे समर्थक, गावोगावचे सरपंच-उपसरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

धानेारे (ता. खेड) येथील शाखा प्रमुखपदापासून राम गावडे यांनी १९९१ पासून आपल्या राजकीय कारर्किदीस सुरुवात केली. पक्ष संघटनेतील बहुतेक सर्वच पदांवर काम करुन तब्बल सहा वर्षे पुणे शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले राम सदाशिव गावडे हे येत्या ५ तारखेला भाजपत प्रवेश करीत आहेत. याबाबतची माहिती राम गावडे यांनी माध्यमांना दिली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे राज्याच्या सर्वोच्च स्थानी बसूनही सामान्य शिवसैनिकांसह जिल्ह्यातील विकासासाठी काहीच दिले गेले नाही. सतत अवमानाची वागणूक आणि वारंवार बैठका-चर्चा करुनही अंमलबजावणीच होत नसल्याने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघ तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण भाजपत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.          शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव, तसेच माजी आमदार सुरेश गोरे यांचे कुटुंब शिंदे गटात दाखल झाले तरी देखील उद्धव ठाकरे यांनी आपली दखल घेतली नाही. त्यामुळे ठाकरे गटातील सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होत असल्याचे पत्र उध्दव ठाकरे यांना ३१ मार्च रोजी पाठविल्याची माहिती गावडे यांनी दिली आहे. राम गावडे यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे आळंदी आणि पंचक्रोशीत भाजपला भविष्यात मोठी ताकद मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस