शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जय हिंद! कोरोनामुक्त पोलिस देणार बाधितांना जीवनदान; प्लाझ्मा दानासाठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 20:03 IST

राज्य व केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांचा स्तुत्य पाऊल..!

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात १६ जवान ठरले पात्र; सहा जणांनी केले दान

पुणे : कोरोनाशी लढा देऊन ठणठणीत झालेले राज्य व केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान प्लाझ्मा दान करून इतर बाधित रुग्णांना जीवनदान देणार आहेत. याची सुरूवात शुक्रवारी (दि. ८) ससुन रुग्णालयात झाली. राज्य राखीव दलाच्या सहा जवानांनी प्लाझ्मा दान केले. यापुढेही टप्याटप्याने आणखी जवान प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.कोरोनामुक्त नागरिकांच्या रक्तामध्ये विषाणुशी लढण्याची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते. त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा काढून अन्य रुग्णांना दिल्यास त्यांच्यामध्येही वेगाने प्रतिकाशक्ती तयार होते. त्यामुळे देशभरात प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. त्यासाठी कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यातूनच राज्य राखीव पोलिस दलाचे जवान पुढे आले आहेत. पहिल्या टप्प्यात १६ जवान पात्र ठरले आहेत. त्यातील सहा जणांनी शुक्रवारी दान केले. यावेळी राज्य राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक नवीनकुमार रेड्डी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, रक्तपेढी प्रमुख डॉ. नलिनी काडगी, डॉ. गणेश लांडे, डॉ. शंकर मुगावे आदी उपस्थित होते. डॉ. तांबे यांच्या हस्ते जवानांना प्रमाणपत्र देण्यात आले.डॉ. तांबे म्हणाले, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवानही प्लाझ्मा दान करणार आहेत. पुढील आठवड्यात त्यांचे प्लाझ्मा दान सुरू होईल. एका प्लाझ्मा दानातून दोन कोरोना रुग्णांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे कोरोनामुक्त नागरिकांनी त्यासाठी पुढे यावे.----------------पुणे विभागातील सुमारे २०० जवान कोरोनाबाधित झाले होते. त्यातील ८५ जवानांचे प्लाझ्मा दान करण्यासाठी समुपदेशन केले. त्यापैकी ६५ जणांच्या रक्ताचे नमुने प्राथमिक तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात येतील. जे प्लाझ्मा दान करण्यास पात्र ठरतील त्यांना टप्प्याटप्याने प्लाझ्मा दान करण्यासाठी ससूनमध्ये पाठविले जाईल.- नवीनकुमार रेड्डी, पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस दल------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसsasoon hospitalससून हॉस्पिटल