शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार

By श्रीकिशन काळे | Updated: February 13, 2025 16:50 IST

शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी येथे साकारला आहे

पुणे: शिवरायांचा पराक्रम आता प्रत्येकाला प्रत्यक्षात समोर घडताना अनुभवता येणार आहे. शिवसृष्टीचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून, येत्या शिवजयंतीच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार आहे. शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच या ठिकाणी साकारला आहे. त्यामध्ये शिवरायांचा ज्वलंत इतिहास पाहता येईल.

महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे शिवसृष्टी साकारली जात आहे. त्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी दिली. याप्रसंगी विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मतालिक, अनिल पवार आदी उपस्थित होते. दुसऱ्या टप्प्यात एक भव्य स्वागत कक्ष, आधुनिक थीम पार्कला साजेल असे टाइम मशीन थिएटर व तुळजाभवानी मातेचे भव्य मंदिराचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज माणूस म्हणून कसे होते, हे देखील सर्वांपर्यंत पोचविण्याचे ध्येय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे होते. त्यानूसार या टप्प्याची रचना केली. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्त्वाची तीन तत्वे यावर आधारित सर्व निर्मिती केली.

भव्य स्वागतकक्षामध्ये शिवसृष्टीची प्रतिकृती साकारली आहे. तसेच शिवरायांचे ६ मोठे पोट्रेट लावले आहेत. याचे वैशिष्ट्ये म्हणजे शिवरायांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिध्द संग्रहालयात असलेल्या चित्रांच्या प्रिंट‌्स आहेत. शिवाजी महाराजांनी केलेल्या लढायांची माहिती देखील येथे वाचायला मिळेल.

तुळजाभवानी मातेचे भव्य मंदिर !

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचे मंदिर या दुसऱ्या टप्प्यात साकारले आहे. मंदिरातील मूर्ती ज्येष्ठ मूर्तीकार डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बनवली आहे. तिची प्रतिष्ठापना मंदिरात होणार आहे आणि या टप्प्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या दिवशी होईल.

फिरते थिएटर !

विशेष असे टाइम मशीन थिएटर जे शिवप्रेमींना एक पर्वणी ठरेल. यामध्ये सुमारे १ हजार वर्ष मागे जाऊन तिथून शिवाजी महाराजांच्या काळात येतो. तीन तत्वावर आधारित कथा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उलगडली आहे. यामध्ये मॅपिंग, होलोग्राफी, फिजिकल इफेक्ट‌ व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ३६० अंशामध्ये फिरणारे रोटेटिंग म्हणजे फिरते थिएटर ज्यावर एका वेळी ११० व्यक्ती बसू शकतील. यात ३३ मिनिटांचा शो अनुभवता येईल.

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजambegaonआंबेगावSocialसामाजिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEducationशिक्षणBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरे