शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाविषयक जनजागृतीसाठी मराठी कलावंतांची ‘आयव्होट’ मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 13:22 IST

आयव्होट मोहिमेमध्ये मराठी चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रातील कलाकार सहभागी आहेत...

पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाविषय जनजागृती करण्यासाठी आता मराठी कलावंत रिंगणात उतरले आहेत.  मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी त्यांनी डिजिटल चळवळ सुरू केली असून, समाजमाध्यमांद्वारे कलाकार हे आयव्होट मोहीम राबविणार आहेत.  मतदानाचे कर्तव्य पार पाडा, असे आवाहन कलाकारांकडून केले जाणार आहे. वाईड विंग्ज मीडिया आणि रंगार्त यांच्यातर्फे या मोहिमेचे व्यवस्थापन केले जाणार आहे. अभिनेता आरोह वेलणकर, सौरभ गोखले, सायली संजीव, पौर्णिमा मनोहर, प्रसाद जवादे, कुशल खोत यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली. शहरी आणि ग्रामीण भागातील मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या विचारातून ही मोहीम राबवण्यात येत आहे. अनुलोम आणि प्रबोधिनी मंच या स्वयंसेवी संस्थांचाही मोहिमेत सहभाग आहे. भारतीय लोकशाही बळकट होण्यासाठी, लोकशाही मूल्ये रूजवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय करता येईल, या विचारातून ही मोहीम राबवण्याची कल्पना पुढे आली. या मोहिमेला अन्य कलाकारांनीही पाठिंबा दिला. सध्या तरूण मतदारांपासून ज्येष्ठांपर्यंत बहुतेक सर्वजण समाजमाध्यमांचा वापर करतात. त्यात ग्रामीण किंवा शहरी असा भेद नाही. त्यामुळे मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी डिजिटल मोहीम राबवण्याची कल्पना पुढे आली, असे आरोह वेलणकरने सांगितले.आयव्होट ही मोहीम संवादी पद्धतीने राबवली जाणार आहे. त्यामध्ये मतदानाविषयीची रंजक माहितीही दिली जाईल. अराजकीय अशी ही मोहीम असून केवळ मतदानासाठी प्रोत्साहन देण्याचा यामागे उद्देश आहे. तसेच ही मोहीम व्यापक होण्यासाठी समाजमाध्यमांतील अन्य व्यासपीठांचीही मदत घेतली जाणार आहे, असे सायली संजीव, पौर्णिमा मनोहर, सौरभ गोखले यांनी सांगितले. -----------अधिकाधिक कलाकारांचा सहभागमोहिमेमध्ये मराठी चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रातील कलाकार सहभागी आहेत. त्यात सुबोध भावे, दीप्ती देवी, वैभव तत्त्ववादी, अक्षय वाघमारे, गश्मीर महाजनी, स्पृहा जोशी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. अधिकाधिक कलाकारांना मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. समाजमाध्यमांसह कलाकार आपापल्या परीने मतदारांशी प्रत्यक्ष संवादही साधू शकतील. मात्र, त्याची निश्चित योजना नसल्याचे आरोहने स्पष्ट केले.--------- 

टॅग्स :PuneपुणेcinemaसिनेमाTheatreनाटक