आयटीयन्सचा ‘कँडल मार्च’

By Admin | Updated: February 2, 2017 04:05 IST2017-02-02T04:05:39+5:302017-02-02T04:05:39+5:30

हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत रविवारी रसिला या आयटी अभियंता तरुणीचा रखवालदाराने खून केला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कंपनीतील अभियंता तरुण-तरुणींनी

ITunes' canal march | आयटीयन्सचा ‘कँडल मार्च’

आयटीयन्सचा ‘कँडल मार्च’

पिंपरी : हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत रविवारी रसिला या आयटी अभियंता तरुणीचा रखवालदाराने खून केला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कंपनीतील अभियंता तरुण-तरुणींनी उत्स्फूर्तपणे कँडल मार्च काढला. हिंजवडी आयटी पार्क फेज २ मध्ये इन्फोसिस कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर अभियंता तरुण-तरुणी एकत्र जमले होते. रसिलाच्या छायाचित्रासमोर मेणबत्त्या पेटवून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास महिला सक्षम आहेत, असे एकीकडे बोलले जाते, तर दुसरीकडे महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला जात नाही. रसिलासारख्या आणखी काही तरुणींना अशाच प्रकारे जीव गमवावा लागला आहे. यापुढे तरी अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेतली जावी, अशी अपेक्षा आयटीयन्स तरुण-तरुणींनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

Web Title: ITunes' canal march