शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

आला पावसाळा, पोट सांभाळा, आहाराचे नियम पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:08 IST

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत बसण्यास, तर रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी ...

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हॉटेलमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत बसण्यास, तर रात्री ११ वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक महिने घरचे अन्न खाऊन आलेला कंटाळा झटकण्यासाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सातत्याने बाहेरचे मसालेदार, चमचमीत पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराचे नियम पाळण्याच्या सूचना डॉक्टरांकडून दिल्या जात आहेत.

पावसाळ्यात तेलकट, तूपकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक तक्रारी सुरू होतात. अपचन होणे, अ‍ॅसिडिटी वाढणे, जुलाब होणे, अतिसार यामुळे तब्येत बिघडते. पचनसंस्थेवर ताणही निर्माण होतो, आतड्याशी संबंधित विकार वाढतात. पित्ताशयात खडे होणे, बद्धकोष्ठता, पोटदुखी असे त्रास पावसाळयातच डोके वर काढतात. हॉटेलमधील चमचमीत पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जातात आणि वजन वाढण्याची शक्यताही निर्माण होते. या दिवसांमध्ये शरीरात वाताचा प्रकोप वाढलेला असतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावलेली असते. त्यामुळे पावसाळ्यात पोट सांभाळावे, असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

-------------------

पावसाळ्यात हे खायला हवे

* पावसाळ्यात घरी बनवलेले ताजे पदार्थ खावेत.

* उकडलेले, उकळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा.

* पचायला हलके पदार्थ खाल्ल्याने पोटविकार उद्भवण्याची शक्यता कमी होते.

* भरपूर पाणी पिण्याची सवय पावसाळ्यातही कायम ठेवावी.

पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे

* उघड्यावरचे आणि शिळे पदार्थ खाऊ नयेत.

* चाट, वडे, भजी अशा पदार्थांमुळे पोट हमखास बिघडते.

* बाहेरचे फळांचे ज्यूस टाळावे.

* मसालेदार, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत.

---------------------

पावसाळ्यासाठी वात आणि पित्त हे दोन्ही दोष वाढतात. जठराग्नी मंद होतो, भूक कमी लागते. या अनुषंगाने आहार आणि विहार यांचे तारतम्य बाळगल्यास पोटाचे आजार होणार नाहीत. वात वाढू नये म्हणून थंड, आंबवलेले पदार्थ टाळावे. उबदार कपडे वापरावे. जेवताना कोमट पाणी प्यावे. वांगी, बटाटा, वाटाणा यासारख्या भाज्या टाळाव्यात. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी पालेभाज्यांचे नियमित सेवन टाळावे. कारण आयुर्वेदानुसार पावसाळ्यात पाण्यामध्ये आम्लता वाढते. ओवा आणि बडीशेप समप्रमाणात थोडे भाजून चूर्ण करून ठेवावे. जेवणानंतर दोन्ही वेळा अर्धा चमचा खावे. जेवणात गरम सूप असावे. ज्वारीची भाकरी एका जेवणात असावी.

- डॉ. प्रसाद बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

-------------------

हॉटेलमध्ये गेल्यावर पावसाळ्यात शक्यतो कच्चे पदार्थ खाऊ नयेत. कच्च्या भाज्यांचे पदार्थ बनवताना, हाताळताना जीव-जीवाणू वाढण्याची शक्यता असते. गरम, शिजवलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा. उदा: सँडविच खाण्याऐवजी इडली, डोसा असे पदार्थ खावेत. हॉटेलमध्ये शिळे घटक पदार्थ वापरले जात असतील तर त्रास होऊ शकतो. गाडीवरचे वडे, भजी वारंवार एकाच तेलात तळले जातात, त्यामुळे पोटाला त्रास होतो. पदार्थ घरी पार्सल आणताना प्रिटेंड कागद वापरला जात असेल, तर त्यावरची शाई पदार्थात उतरू शकते. त्यामुळे शक्यतो घरचा डबा घेऊन पार्सल आणायला जावे किंवा चांगला कागद वापरला आहे की नाही, ते पाहावे.

- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ

---------------------