शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

या वर्षी पहिल्यांदाच आले, इथून पुढं दरवर्षी येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 19:10 IST

काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखाे भीम अनुयायी आले हाेते. इथे आल्यानंतर महार सैनिकांनी दाखविलेल्या शाैर्याचा त्यांना अभिमान वाटत हाेता.

पुणे : बाबासाहेबांनी आमच्यासाठी, जगासाठी एवढं केलं मग त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालयाला नकाे का, त्यांच्यासाठी एक दिवस द्यायलाच पायजे म्हणून मी इथे आले. या वर्षी पहिल्यांदाच आले, इथून पुढं आता दरवर्षी येणार. काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळच्या पटांगणात बसलेल्या शांताबाई साेळस सांगत हाेत्या.

    मागील वर्षी काेरगाव भीमा येथील लढाईला 200 वर्षे पुर्ण झाल्यामुळे लाखाे आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. यावेळी येथे उसळलेल्या दंगलीमध्ये हजाराे आंबेडकर अनुयायांच्या गाड्यांचे नुकसान करण्यात आले हाेते. या दंगलीत एका तरुणाचा मृत्यू देखील झाला हाेता. या दंगलीचे पडसाद देशात उमटले हाेते. यंदा माेठा पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. 

    यंदाच्या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिक पटीने आंबेडकर अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले हाेते. शांताबाई या पहिल्यांदाच आल्या हाेत्या. काेरेगाव भीमाच्या विजयस्तंभाचा इतिहास त्यांना फारसा माहित नव्हता परंतु बाबासाहेब या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी हे आपल्या शाैर्याचे प्रतिक आहे असे सांगितले एवढेच त्यांना माहित हाेते. त्यामुळे इथे आलंच पाहिजे असं त्यांनी मनाशी पक्क ठरवलं हाेतं. शांताबाई त्यांचा मुलगा आणि गावातील इतर लाेकांबराेबर औरंगाबादच्या पदमपुरी या गावातून आल्या हाेत्या. इथं आल्यावर मन भरुन आलं. अभिमान वाटला असं शांताबाई आवर्जून सांगत हाेत्या.

    शांताबाई म्हणाल्या, आंबेडकरांनी जगासाठी एवढं केलं मग त्यांच्यासाठी आपण एक दिवस तरी द्यायलाच पाहिजे. या वर्षी मी पहिल्यांदाच इथं आले, परंतु या पुढे दरवर्षी येणार. बाबांनी आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. आणि हा विजयस्तंभ म्हणजे जातीयता माेडून टाकण्याचं पहिलं पाऊल आहे. आता जातीयता कमी झाली असली तरी ती अजून संपली नाही. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर