शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दहावी - बारावीत क्रीडा गुण मिळवणे होणार कठीण : शिक्षण विभागाने बदलला नियम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:59 IST

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत.

पुणे : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या  क्रीडा गुणांच्या सवलतीमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (२०१८-१९) काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत विविध खेळप्रकारांमध्ये मिळवलेल्या प्राविण्याचा विचार होणार आहे, मात्र त्यांनी इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये त्या खेळप्रकारामध्ये सहभाग घेतला असणे आवश्यक असणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.           दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रविष्ठ होणारे खेळाडू विद्यार्थी तसेच एनसीसी, स्काऊट गाइडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दती राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आलेल्या ११ खेळप्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेले असल्यास त्याचाच विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी इयत्ता ६ वी ते १० पर्यंत जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असल्यास शासनाच्या परिशिष्ट ६ मधील तरतुदीनुसार त्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ पर्यंत गुण दिले जाणार आहेत. मात्र त्यानंतर इयत्ता दहावीमध्ये असताना त्या विद्यार्थ्यांने संबंधित क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे. इयत्ता १२ वीमध्ये गुणांची सवलत मिळविताना त्याने बारावीमध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.            खेळाडू कोणत्याही जिल्हयातून खेळला असला तरी विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकत असेल त्या जिल्हयाच्या क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यास प्रमाणित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले असले तरी त्याने ज्या उच्चतम असणाऱ्या क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला त्या एकाच सवलतीचे गुण त्याला दिले जातील. जिल्हा क्रीडा अधिकारी  त्यांना शाळांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून ३० एप्रिल पूर्वी ते संबंधित विभागीय मंडळास शिफारशींसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणSSC Results 2018दहावी निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८examपरीक्षा