शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 18:19 IST

रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर चर्चेत आलेल्या त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी नोंदवली.इतकेच नव्हे तर पगड्या बघायला आणि खरेदीला येणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

पुणे :  रविवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमानंतर चर्चेत आलेल्या त्या पगडीवरून इतके रामायण होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते अशी प्रतिक्रिया मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे शिरीष मुरुडकर यांनी नोंदवली.इतकेच नव्हे तर  पगड्या बघायला आणि खरेदीला येणाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.       रविवारी पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी आवर्जून छगन भुजबळ यांचा पुणेरी पगडी ऐवजी फुले पगडी घालून सन्मान केला. त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र ही पगडी कुठून घेण्यात आली याबद्दल माहिती  असता बुधवार पेठेतील मुरुडकर झेंडेवाले या दुकानाचा शोध लागला. या दुकानात अनेक वर्षांपासून पगड्या तयार केल्या जात असून बाजीराव मस्तानीसारख्या चित्रपटातही इथल्या पगड्या वापरल्या गेल्या आहेत. इथे पुणेरी आणि फुले पगडी व्यतिरिक्त शिंदेशाही पगडी, बत्ती पगडी, तुकाराम पगडी, मराठमोळा फेटा, पेशवाई पगडी, मावळे पगडी अशा विविध पगड्या मिळतात. याच दुकानातून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी सुरुवातीची पुणेरी पगडी  आणि नंतरची फुले पगडी आणण्यात आली होती.         याबाबत मुरुडकर यांना विचारले असता, त्यांनी कायमच आमच्याकडे सत्कार समारंभांसाठी पगड्या खरेदी करण्यासाठी गर्दी असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमासाठी पुणेरी पगड्या खरेदी करण्यात आल्या हेच मुळात माहिती नसल्याचे सांगितले.नंतर घाईघाईत फुले पगडी घेण्यासाठी आलेले कार्यकर्तेही भर सभेतून धावतपळत आल्याचे माहिती नव्हते.मात्र दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र आणि दूरदर्शनवर आमच्या दुकानाचे नाव आणि पगडीची चर्चा होत असल्याचे काहींनी सांगितले. पुढचे दोन दिवस तर पगडीवरून इतकी चर्चा, लेख, मुलाखती बघायला मिळाल्या की या घटनेवरून एवढी चर्चा होईल असे स्वप्नातही वाटले नसल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात या पगडी प्रकारानंतर पगड्या बघायला आणि खरेदी करायला अधिक गर्दी होत असल्याचे त्यांनी आवार्जून सांगितले. येणारे ग्राहक प्रत्येक पगडीसोबत त्याची वैशिष्टयही विचारत असल्याचा अनुभव त्यांनी कथन केला. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारChhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेस