संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक : उपमुख्यमंत्री अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:08 IST2021-04-26T04:08:51+5:302021-04-26T04:08:51+5:30

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात रविवारी (दि. २५) 'कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या ...

It is necessary to break the chain of infection: Deputy Chief Minister Ajit Pawar | संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक : उपमुख्यमंत्री अजित पवार

संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक : उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात रविवारी (दि. २५) 'कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन द्याव्यात. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना बाबतची माहिती दिली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

-------------------------------

Web Title: It is necessary to break the chain of infection: Deputy Chief Minister Ajit Pawar