शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 21:05 IST

हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

पुणे : हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघ समाजात सेवाभावी कामांमधून आपलेपणा निर्माण करतो असे ते म्हणाले.आयुर्वेद भास्कर प. य. तथा दादा वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिरात डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सिम्बायोसिस शिक्षणसंस्थेचे संस्थापक शां.ब. मुजुमदार, डॉ. राजीव ढेरे विनायक खडीवाले, संगीता खडीवाले व्यासपीठावर उपस्थित होते. संघाची कामकाज पद्धत, संघाचा सेवाभाव याबद्दल डॉ. भागवत यांनी विस्ताराने माहिती दिली, त्याचबरोबर वैद्य खडीवाले यांच्या चरित्रग्रंथाच्या वाचनातून त्यांच्यासारख्याच अनेक सेवाव्रतींना प्रेरणा मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.डॉ. भागवत म्हणाले, संघाचे काम सेवाभावातून आपलेपणा निर्माण करते. तुम्ही काम सुरू करा, संघ तुमच्याबरोबर येईल अशी ही पद्धत आहे. प्राण्यांना भूक समजते, भूक भागली हेही समजते. त्यानंतर ते काही बरोबर बांधून वगैरे घेत नाहीत. मनुष्याला बुद्धी आहे. ती आपलेपणाकडे झुकली असेल तर देवरूप होते, स्वार्थाकडे झुकली तर राक्षस होते. त्याची उदाहरणे आहेत, तसेच आपलेपणातून निर्माण झालेल्या विविधांगी कामांचाही उदाहरणे आहेत. असा आपलेपणा हिंदू समाजात निर्माण करणे हे काम संघ करतो.डॉ. मुजुमदार यांनी महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही अशी खंत व्यक्त केली. वैद्य खडीवाले यांच्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. ग्रंथनिर्मितीसाठी लेखिका तनुजा राहणे, मुद्रक गिरीश दात्ये यांचा डॉ. भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दादा खडीवाले यांच्या कार्याविषयीच्या माहितीपटाचे सादरीकरण झाले. संगीता वैद्य खडीवाले यांनी स्वागत केले. विनायक वैद्य खडीवाले यांनी प्रास्ताविक केले. वैद्य शुभंकर कुलकर्णी धन्वंतरी स्तवन केले. स्नेहल दामले यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. ढेरे यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.आयुर्वेदातील जी काही मोठी नावे आहेत त्यातली बहुतांशी महाराष्ट्रातील आहेत, मात्र महाराष्ट्रात आयुर्वेद विद्यापीठ नाही. ते राजस्थानमध्ये आहे, नेहमीप्रमाणे ते गुजरातमध्येही आहे असे डॉ. मुजुमदार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात हे विद्यापीठ व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी डॉ. मुजुमदार यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMohan Bhagwatमोहन भागवत