शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे ही चांगली गोष्ट - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 17:36 IST

राजकारण बाजूला ठेवून निर्णय प्रक्रियेतील लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे

बारामती : सर्वच राजकीय पक्षांनी, कुटुंबांनी एकत्र येणे महाराष्ट्राच्या हितासाठी चांगलीच गोष्ट आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना गेले तीन महिने वारंवार विनंती करत आहे की, महाराष्ट्रातील क्राइम , शेतकरी आत्महत्या, शिक्षक आत्महत्या, महिलांवरील अत्याचार यासाठी सर्वपक्षीय समिती स्थापन करा. आज राज्यात पाण्याची परिस्थिती गंभीर होत आहे. मला असे वाटते की, राजकारण बाजूला ठेवून निर्णय प्रक्रियेतील लोकांनी एकत्रित येऊन राज्याच्या विकासासाठी काम केले पाहिजे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. खासदार सुप्रिया सुळे सोमवारी बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 महाराष्ट्रासाठी ठाकरे कुटुंब एकत्र आले तर हा सुवर्णक्षण असेल, त्यासाठी राज्यातील इतर राजकीय कुटुंबांनी एकत्र यावे असे ट्विट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. यावर खासदार सुळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, याचे मी स्वागतच करते, खरंतर हे मीच सुरुवातीला बोलले आहे. दोघे ही एकत्र येत असतील तर तो सुवर्ण क्षणच असेल. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली. 

उष्णता प्रचंड वाढली आहे. पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मागील दहा-पंधरा दिवसांपूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा आढावा घेतला होता. १०० टक्के प्लस  भरलेले उजनी धरण आज शून्यावर आले आहे. मतदार संघात जिथे जिथे टँकरची गरज आहे. तेथे जिल्हा अधिकाऱ्यांनी एक दिवसाचाही विलंब न करता आदेश देऊन टँकरची सोय करावी. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

कांदा, दूध, सोयाबीन बाबत मी कित्येक दिवसांपासून केंद्र सरकारला बोलत आहे. मी सातत्याने केंद्र सरकारला निर्यात शुल्क सबसिडी बंद करा सांगत आहे. याचे श्रेय भगरे सर निलेश लंके यांना जाते. त्यांनी सातत्याने यावर आवाज उठवून तो ४० टक्के वरून शून्यावर आला. पवारसाहेब कृषी मंत्री असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे निर्णय घेतले जात होते. तस या सरकारला करण्यापासून कुणी रोखले आहे,असे खासदार सुळे म्हणाल्या.

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस