"हिजाब सारखे मुद्दे निवडणुका जवळ आल्या की तापवले जातात", जावेद अख्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:08 PM2022-03-04T18:08:40+5:302022-03-04T18:09:00+5:30

ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात

Issues like hijab are heated as elections approach Javed Akhtar said | "हिजाब सारखे मुद्दे निवडणुका जवळ आल्या की तापवले जातात", जावेद अख्तर

"हिजाब सारखे मुद्दे निवडणुका जवळ आल्या की तापवले जातात", जावेद अख्तर

Next

पुणे : ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात. त्याप्रमाणेच कर्नाटक हिजाब वगैरे सारखे मुद्दे पावसाळा जवळ आला की बेडूक कसे बाहेर येतात तसे निवडणुका जवळ आल्या की तापवले जातात. निवडणुका संपल्या की मुद्दे देखील आपोआप संपतात अशी टीका जावेद अख्तर यांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणाऱ्या लोकांवर केली आहे. विसाव्या  पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.

''आज माणसे भावनिकदृष्ट्या संवेदनशील होत चालली आहे. आयुष्यात काही विधायक न केलेल्याच व्यक्ती विरोधाचा पवित्रा घेतात. काही न करता लोकांच्या धार्मिक भावना लगेच दुखावतात. नैतिक मूल्यांना धक्का लागला तर भावनादुखावल्याचे कधी ऐकवित आहेत का? ज्यांच्याकडे विरोधाला काही कारण नसते ते कोणत्याही गोष्टी भावनेशी जोडतात, अशा परखड शब्दांत त्यांनी यावेळी विरोधकांना टोला लगावला.'' 

चांगला विषय असेल तर काही वेळा चालवून घ्यायचे किंवा दुर्लक्ष करायचे 

ओटीटी खूप सशक्त माध्यम आहे. जे बोल्ड विषय चित्रपटात येऊ शकत नाहीत ते ओटीटीवर येऊ शकतात. भाषेमध्ये शिव्यांचा भडिमार असला तरी हे माध्यम येण्यापूर्वी शिव्या दिल्याच जात नव्हत्या का?  समाजातही एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना आपल्या कानावर एकही शिवी पडत नाही का? समाजात शिव्या दिल्याच जात नाहीत असं तर होत नाही ना? मी त्याचे समर्थन करीत नाही आणि स्वत:ही कधी शिव्या देत नाही. पण चांगला विषय असेल तर काही वेळा चालवून घ्यायचे किंवा दुर्लक्ष करायचे असंही ते म्हणाले. 

...सरकार प्रयत्न करीत आहे

युद्ध ही वेदनादायी आणि दु;खदायक घटना आहे. हा एक राष्ट्रीय मुद्दा आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे असे सांगत अख्तर यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Issues like hijab are heated as elections approach Javed Akhtar said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.