The issue of cleanliness in theaters pune has always been controversial | पुण्यातील नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त

पुण्यातील नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त

ठळक मुद्देमनुष्यबळाची कमतरता केव्हा होणार दूर : पुरेसे पाणी देण्याची आवश्यकता 

लक्ष्मण मोरे -

पुणे : भिंतींना आलेले पोपडे, उडालेला रंग, तुंबलेली आणि अस्वच्छ स्वच्छतागृहं, बेसिनमध्येपडणाऱ्या पिचकाऱ्या ही आहे नाट्यगृहांमधील स्वच्छतेची अवस्था! नाट्यगृहांमधील स्वच्छतेचा मुद्दा कायमच वादग्रस्त राहिला आहे. मराठी नाट्य-सिने कलाकारांनी याबाबत सोशल मीडियावरुन नाराजीही यापुर्वी व्यक्त केलेली आहे. अलिकडच्या काळात तर चौदा नाट्यगृहांमध्ये पाण्याची समस्या उद्भवली आहे. पाणी कमी पडू लागल्याने स्वच्छतेवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. 
पालिकेच्या चौदा नाट्यगृहांमध्ये असलेली स्वच्छतागृहे अस्वच्छ असल्याची तक्रार अनेकदा प्रेक्षकांकडून केली जाते. नाट्यगृहांची आसनक्षमता ७०० पासून अडीच हजारांपर्यंत आहे. यातील गणेश कला मंचाची आसनक्षमता सर्वाधिक अडीच हजार आहे. नाटके, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांसोबतच लावण्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. त्यातही लावण्यांच्या कार्यक्रमाला सर्वाधिक गर्दी असते. मोठ्या संख्येने प्रेक्षक येत असल्याने त्या प्रमाणात अस्वच्छताही होते. परंतू, मनुष्यबळाची आणि पाण्याची कमतरता असल्याने वेळीच आणि पुरेशी स्वच्छता करण्यात व्यवस्थापन कमी पडते. नाट्यगृहांमध्ये झाडणे, पुसणे आणि स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकरिता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. परंतू त्यांची संख्या अपुरी आहे. त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा आणि साधनसामुग्रीही मर्यादित आहे.  त्यामुळे स्वच्छतेच्या कामांवरही त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळते. 


याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष केले जाते. आवश्यक साधने पुरविणे आणि वारंवार स्वच्छता ठेवणे याकडे जाणिवपुर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. परंतू, नाट्यगृहांच्या कामांना अधिकाºयांकडून दुय्यम समजले जात असल्याने त्यांच्या लेखी हा विषय  ‘प्रायोरिटी’चा नसतो. पुण्यासह राज्यभरातून येणाºया हजारो नाट्यरसिकांना चांगल्या सुविधा देण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतागृहांसोबतच आवारातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापनावरही लक्ष देणे आवश्यक आहे. 

=====
रंगमंच सहायकाची रिक्त पदे कधी भरणार?
नाट्यगृहांमधील रंगमंच सहायकांची पदे कधी भरणार असा प्रश्न आहे. पालिकेच्या चौदा नाट्यगृहांसाठी ७० पेक्षा अधिक रंगमंच सहायकांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीमध्ये अवघे ४० रंगमंच सहायक आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाºयांवर कामाचा ताण येत आहे. काही महिन्यांपुर्वी कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये एका रंगमंच सहायकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. रिक्त असलेली उर्वरीत ३० पदे भरली जाणे आवश्यक आहे. 
.........
नाट्यगृहांची नाटके (मालिका भाग - २) जोड


======
नाट्यगृहांच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक, कनिष्ठ अधिक्षक दर्जाच्या अधिकाºयांची तब्बल १५ पदे रिक्त आहेत. ही वरिष्ठ पातळीवरील पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम नाट्यगृहांच्या व्यवस्थापनावर होत आहे. कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी नाट्यगृहांमध्ये अधिकाºयांची ‘भूमिका’ निभावत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. या कर्मचाºयांची मक्तेदारी झाल्यासारखी परिस्थिती असून या कर्मचाºयांच्या कामामध्ये बदल केल्यास हे कर्मचारी नगरसेवक अथवा राजकीय दबाव स्थानिक अधिकाºयांवर आणतात. रिक्त पदे भरण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर वारंवार पत्र व्यवहार करुनही रुल्स अ‍ॅन्ड रेग्यूलेशनचे (आरआर) कारण देत चालढकल करण्यात येत आहे.
======
नाट्यगृहांमधील दुरु स्तीवर तीन वर्षात ९० लाखांच्या आसपास खर्च झाला आहे. गेल्या तीन वर्षात ५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. त्यापैकी अवघा ९० लाखांचा खर्च देखभाल दुरुस्तीवर झाला आहे. भवन विभागाने या निधीचा पुरेपुर वापर करुन देखभाल दुरुस्तीवर भर दिल्यास नाट्यगृहांची  ‘शोभा’ वाढेल. बालगंधर्व रंगमंदिर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नाट्यगृह, बिबवेवाडी, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि गणेश कला मंच ही चार नाट्यगृहे सोडली तर अन्य नाट्यगृहांमधून अतिशय तोकडे उत्पन्न मिळते. त्यामुळे उर्वरीत दहा नाट्यगृहे म्हणजे पांढरे हत्ती पोसण्यासारखे झाले आहे. त्यामुळे अधिकारी आता नवी नाट्यगृह बांधू नयेत असे मत व्यक्त करीत आहेत. 
======
नाट्यगृहांच्या दुरुस्तीवर झालेला खर्च 
वर्ष        तरतूद                खर्च
२०१७-१८    १० कोटी ३ कोटी             ३७ लाख ८५ हजार
२०१८-१९    १६ कोटी ६ लाख             ३३ लाख ३७ हजार
२०१९-२०    ११ कोटी ६ लाख             १७ लाख ८३ हजार 
एकूण        
======

Web Title: The issue of cleanliness in theaters pune has always been controversial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.