शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

इस्रो, नासाची सफर नियंत्रित होणार सुकाणू अन् कार्यकारी समितीद्वारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:12 IST

७५ विद्यार्थ्यांना संधी : जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्हा परिषद करणार संपूर्ण खर्च, उन्हाळ्याच्या सुटीतदेखील या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तयारी करून घेण्याच्या सूचना

जेजुरी : ग्रामीण भागातील पालकांची बिकट आर्थिक परिस्थिती, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या कमी सोयी-सुविधांमुळे प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांमध्ये संशोधक व चिकित्सक वृत्ती निर्माण होऊन विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, संशोधन क्षेत्राकडे मुलांचा कल वाढावा, मुले शास्त्रज्ञ व्हावेत या अनुषंगाने जागतिक स्तरावरील उच्च दर्जाच्या अंतराळ संशोधन करणाऱ्या संस्थांना भेट देऊन तेथील अनुभव, कार्यपद्धती व माहिती घेऊन भविष्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ घडविण्याच्या उद्देशाने इस्रो व नासा या अंतराळ संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांना ग्रामीण भागातील ७५ विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये जिल्हा नियोजन समिती मार्फत भेट (सहल) घडविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने केले आहे. इस्रो व नासा अंतराळ संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी योग्य व जिज्ञासू विद्यार्थ्यांची निवड व्हावी म्हणून पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता सहावी व इयत्ता सातवीच्या सर्व इच्छुक विद्यार्थ्यांची सामान्य विज्ञान व गणित पाठ्यपुस्तकांमधील अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुटीतदेखील या विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन तयारी करून घेण्याबाबतच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

यासाठी तीन चाळणी परीक्षा घेण्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ०५ जुलैला पहिली चाळणी परीक्षा, १९ जुलैला दुसरी चाळणी परीक्षा, तर जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तिसरी चाळणी परीक्षा होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या चाळणी परीक्षेचे स्वरूप पर्यायी उत्तर प्रश्न स्वरुपात, तर तिसरी चाचणी ही आयुका, पुणे  येथे विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन अंतिम ७५ विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. पहिल्या चाळणी परीक्षेसाठी आयुका संस्थेने जिल्हा परिषदेला प्रश्नपत्रिका देऊन जिल्हास्तरावर प्रश्नपत्रिकांची छपाई करून परीक्षेच्या एक दिवस अगोदर संबंधित गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तालुकास्तरावर दिल्या जातील. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक व लिपिकांची या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करून परीक्षेबाबत गोपनीयतेबाबत सुचविले आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी स्कॅनिंग मशीनद्वारा जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.  

आयुकामार्फत निवडनिवड केलेल्या विद्यार्थ्यांची दुसरी चाळणी परीक्षा तालुकास्तरावर एमकेसीएलच्या केंद्रावर घेण्यात येईल. परीक्षेमधून उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची १:४ प्रमाणात निवड करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना आयुका, पुणे येथे संस्थेच्या कॅम्पस भेटीसाठी पाठविले जाईल. चौकस बुद्धी व वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी निरीक्षण करून व मुलाखतीद्वारे आयुका मार्फत ४:१ या प्रमाणात असे एकूण ७५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल.

पाच अधिकारी, चार शिक्षकांचाही समावेशनिवड केलेल्या ७५ विद्यार्थ्यांमधून ५० विद्यार्थी, ५ अधिकारी व ४ शिक्षक यांना इस्रो येथे, तर २५ विद्यार्थी, ५ अधिकारी व ४ शिक्षक यांना नासा या अंतराळ संस्थेस भेटीसाठी पाठविले जाणार आहेत. इस्रो व नासा भेटीचा विमान प्रवास, वैद्यकीय विमा, इतर शैक्षणिक स्थळांच्या भेटी, निवासस्थान व जेवण खर्च जिल्हा नियोजन समिती मार्फत जिल्हा परिषद करणार आहे. जिल्हा सुकाणू व जिल्हा कार्यकारी समितीमार्फत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड