शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

विमान प्रवाशांचे विलगीकरण आता घरी; परदेशातून निघतानाच करायची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 3:21 AM

विमान प्रवाशांनी परदेशातून प्रवासाला निघतानाच कोविड चाचणी करून घ्यायची आहे. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवास करता येईल.

पुणे : कोरोनामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी ‘वंदे भारत’ ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत भारतात परतणाऱ्या प्रवाशांसाठी बंधनकारक केलेले १४ दिवसांचे ‘हॉटेल क्वारंटाइन’ (विलगीकरण) बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी त्यांना घरीच विलगीकरण पाळण्याची मुभा दिली आहे.यासाठी विमान प्रवाशांनी परदेशातून प्रवासाला निघतानाच कोविड चाचणी करून घ्यायची आहे. ती निगेटिव्ह असेल तरच त्यांना प्रवास करता येईल. ही माहिती तिथूनच त्यांनी खास पोर्टलवर अपडेट करायची आहे. या माहितीची तपासणी भारतातील विमानतळावर केली जाईल. त्या माहितीची खातरजमा केल्यावर विमानतळावरून त्यांंना घरी क्वारंटाइन होण्याची परवानगी दिली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.लोहगाव विमानतळावरही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. विमानतळाचे समन्वय अधिकारी अशोक घोरपडे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, विमानतळावर रोज दोन ते अडीच हजार प्रवासी परदेशातून व भारतातून पुण्यात येतात. परदेशातून थेट पुण्यात कमी फ्लाईट आहेत.दिल्ली, मुंबईत उतरणारे आणि तिथून पुण्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. केंद्र सरकारने नव्याने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार १० वर्षे वयाखालील मुले-मुली तसेच वृद्ध व्यक्ती बरोबर असल्यास त्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. यासाठी महापालिकेचे काही कर्मचारी विमानतळावरनियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून प्रवाशांच्या नोंदी, तपासणी अहवाल पाहणे, तो योग्य ठिकाणी पाहणे ही कामे केली जातात.विमान प्रवाशांवर ‘वॉच’घरीच विलगीकरणाची परवानगी दिलेल्या विमान प्रवाशांची दूरध्वनी, मोबाइल क्रमांकासह नाव, पत्ता अशी सर्व माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे दिली जाते. तिथून या प्रवाशांची दर दोन-तीन दिवसांनी माहिती घेतली जाते. - अशोक घोरपडे, समन्वयक, लोहगाव विमानतळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या