शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

ईशान-जान्हवीची पुणेकरांना मिळाली ‘धडक’ भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 3:05 AM

वेळ सायंकाळची... ते दोघे येणार, याची चर्चा पसरली आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या आगमनाकडे लागल्या. बॉलिवूडमधल्या नव्या ‘चांदनी’ने बदामी आणि गुलाबी रंगाच्या पेहरावात तर त्याने कूल अशा टीशर्ट आणि जीन्सच्या वेशभूषेत ‘धडक’ मारली आणि एकच जल्लोष सुरू झाला.

पुणे - वेळ सायंकाळची... ते दोघे येणार, याची चर्चा पसरली आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या आगमनाकडे लागल्या. बॉलिवूडमधल्या नव्या ‘चांदनी’ने बदामी आणि गुलाबी रंगाच्या पेहरावात तर त्याने कूल अशा टीशर्ट आणि जीन्सच्या वेशभूषेत ‘धडक’ मारली आणि एकच जल्लोष सुरू झाला. एवढी मोठी गर्दी पाहून त्यांच्यामध्येही जोश संचारला आणि दोघांची पावले ‘झिंगाट’च्या गाण्यावर थिरकली... त्यांचे अशा पद्धतीने चाहत्यांना भेटणे तरुणाईला खूपच आवडल्याने सर्वजण त्यांच्या प्रेमात पडले. दोघांच्या उपस्थितीने ‘सिझन्स मॉल’चे वातावरण पूर्णत: ‘धडक’मय झाले होते. शुभारंभ ढोल-ताशा ध्वज पथकाने त्यांचे ढोल वाजवून दणक्यात स्वागत केले.मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक केलेल्या ‘सैराट’चा हिंदी रिमेक असलेला झी स्टुडिओज व धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ‘धडक’ हा चित्रपट येत्या २८ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने ‘लोकमत’च्या वतीने त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लोकमत’ ‘धडक’ भेट या कार्यक्रमाचे पॉवर्ड बाय पार्टनर हॅशटॅग हे होते.परशा आणि आर्चीसारखीच सध्या जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचे पदार्पण असणाऱ्या ‘धडक’ची क्रेझ तरुणाईमध्ये निर्माण झाली आहे. रसिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोघांचे मॉलमध्ये आगमन होण्यापूर्वी सिपा डान्स ग्रुपने धडाकेबाज नृत्यामधून वातावरणनिर्मिती केली.त्या दोघांची मॉलमध्ये ‘एंट्री’ होताच तरुणाईमध्ये एकच जल्लोष सुरू झाला. त्या दोघांची छबी कॅमेºयात बंदिस्त करण्यासाठी सर्वांचे मोबाईल सरसावले. ते दोघे स्टेजवर चढताच तरुणाईने शिट्ट्यांनी आसमंत दणाणून सोडला. प्रेक्षकांमधील उत्साह पाहून दोघांनी ‘धडक’मधील रोमँटिक गाण्यावर डान्स केला. त्यानंतर ‘झिंगाट’चे गाणे सुरू झाले आणि त्यांच्यासमवेत तरुणाईची पावलेही थिरकली. या गाण्यामध्ये सर्वच जण देहभान हरपून गेले. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले. सर्वांसोबत सेल्फी घेणे शक्य नसल्याने व्यासपीठावरूनच दोघांनी सर्वांबरोबर सेल्फी काढला. त्या दोघांच्या निरागसपणाने सर्वांनाच वेड लावले. या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक खत्रीबंधू मस्तानी व पॉट आईस्क्रिम तसेच एफएम पार्टनर रेडिओ सिटी व स्थळ प्रायोजक सिझन्स मॉल होते.स्टार किड्स असूनही जान्हवी व ईशान हे प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत, हे वाखाणण्याजोगे आहे. हॅशटॅगच्या वतीने त्यांचे स्वागत करण्याची संधी दिल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार तसेच ‘धडक’साठी त्या दोघांना शभेच्छा! - निवेदिता नहार,संचालिका, हॅशटॅगमोठ्या संख्येने तरुणाई कलाकारांना पाहण्यासाठी उपस्थित होती. एकूण वातावरणच जल्लोषमय झाले होते. जान्हवी-ईशानचे स्वागत पुणेकरांनी अगत्याने केले असेच म्हणावे लागेल.- गिरीश खत्री, संचालक खंत्रीबंधू मस्तानी व पॉट आइस्क्रीमउत्तम अभिनयाप्रमाणेच उत्तम डान्स सादर करीत ईशान व जान्हवीने सर्वांची मने जिंकून घेतली. भविष्यातही सिनेजगतात या दोघांची वाटचाल उज्ज्वल राहो. ‘लोकमत’ने नवोदित कलाकारांना पाठिंबा देण्याचा वसा पुढेही चालू ठेवावा.- विनय अरान्हा, रोझरी गु्रप

टॅग्स :Puneपुणेentertainmentकरमणूक