शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

​पंतप्रधानांनी कौतुक केलेला ‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित? भाजपच्या नगरसेवकांचे महापालिका आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:45 IST

फूटपाथवर उभारलेला ‘कलाकार कट्टा’, या जागेमुळे वर्दळीच्या चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, त्यामुळे हा कट्टा पर्यायी ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे

पुणे: भाजपच्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या संकल्पनेतून गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये या कलाकार कट्ट्याचे कौतुक केले आहे. मात्र, या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणावरून हा कट्टा इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्याच नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना कलाकार कट्टा स्थलांतरित करण्यासंबंधी लेखी पत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भांडारकर रस्त्याला लागूनच फुटपाथच्या एका बाजूला कलाकार कट्ट्यावर शांतपणे कॅनव्हासवर चित्र रेखाटणारे कलाकार, वाद्यांचे सादरीकरण करणारे तरुण वादक आणि शॉपिंगला आलेल्या पुणेकरांची कट्ट्यावर थांबणारी पावले, असे नित्यनेमाने पाहायला मिळत असलेले चित्र. गुडलक कॅफेच्या प्रवेशद्वाराजवळील फूटपाथवर उभारलेला ‘कलाकार कट्टा’, कलाकारांचे प्रदर्शन आणि बसण्याच्या जागेमुळे वर्दळीच्या चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वाहतूक सुरळीत करण्यासाठी हा कट्टा पर्यायी ठिकाणी हलविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. दरम्यान, भाजपच्या नगरसेवकांनी पत्र दिल्यानंतर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हा कलाकार कट्टा भाजपच्या पाठिंब्यानेच झाला आहे. तेव्हा कळले नाही का? आत्ता कुठे कलाकार कट्टा नावारूपाला आला आहे. तुम्ही एखादे झाड तोडून दुसरीकडे लावणार का? आम्ही केवळ इथे कलाच सादर करीत नाही तर पुणेकरांना शिस्तही लावण्याचा प्रयत्न करतो. गर्दीच्या ठिकाणी कला पाहिली जाणार ना? - आनंद टेके, चित्रकार

मी कलाकार कट्ट्यावर साडेतीन वर्षांपासून कला सादर करीत आहे. कलाकारांना या कट्ट्यावर जास्त चांगला प्रतिसाद मिळतो. लोकांनी यावे आणि आमच्या कलेचे कौतुक करावे, असे वाटते. आमच्याकडे अनेक तरुण कलाकारांना स्फूर्ती मिळाली आहे. - राकेश लोखंडे, चित्रकार

कलाकार कट्टा सुरू होण्याच्या आधीपासून मी इथे कला सादर करीत आहे. आमच्या इथे बसण्यामुळे जर वाहतूक कोंडी होणार असेल तर मग इतर रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीचे काय? प्रत्येक माणूस इथे पोटासाठी येत आहे. - चंद्रकांत विभांडीक, ज्येष्ठ चित्रकार

फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकातील कलाकार कट्ट्यासंदर्भात नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या काही तक्रारी आल्या आहेत. या अनुषंगाने मी स्वत: तेथे जाऊन पाहणी केली. या कट्ट्याचा वाहतुकीला अडथळा होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. मात्र, याबाबत कोणताही निर्णय घाई गडबडीने घेतला जाणार नाही. विरोध करणारे आणि कट्ट्याच्या बाजूने असणाऱ्यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. - नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका, पुणे.

‘कलाकार कट्टा’ स्थलांतरित करण्याबाबतच्या भाजपच्या नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनाचा आम्ही निषेध करतो. वाहतुकीस कोणताही थेट अडथळा निर्माण होणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊनच तो उभारण्यात आला आहे. उलट, हा कट्टा पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रकार, व्यंगचित्रकार, शिल्पकार आणि विविध कला सादर करणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांसाठी एक खुले व्यासपीठ आहे. - बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's 'Kalakar Katta', praised by PM, faces relocation due to traffic?

Web Summary : Pune's 'Kalakar Katta', lauded by the PM, may relocate due to traffic concerns. BJP corporators requested the move. Artists oppose, citing its value and manageable impact. Municipal Commissioner is reviewing the situation after complaints.
टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाcultureसांस्कृतिकartकलाcommissionerआयुक्तNarendra Modiनरेंद्र मोदी