शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

IRONMAN African Championship: बारामतीचा सुपुत्र अवघ्या १८ व्या वर्षी ठरला 'आयर्नमॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:02 IST

बारामतीचा शहरातील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिका येथे शनिवारी पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

बारामती : बारामतीचा शहरातील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिका येथे शनिवारी पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतातून सर्वाधिक कमी वयाचा आयर्नमॅन होण्याचा विक्रम अभिषेकने वयाच्या १८ व्या वर्षी केला आहे. आयर्नमॅन होण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत ‘आयर्नमॅन’ हा जगविख्यात मानला जाणारा मानाचा किताब मिळविला आहे.

बारामतीचे पहिले आयर्नमॅन ,तसेच जागतिक पातळीवर तीनदा आयर्नमॅन झालेले सतीश ननवरे हे अभिषेकचे वडील आहेत. आपल्या पित्याकडून प्रेरणा घेत त्यांचेच मार्गदर्शन घेत अभिषेक ने हे यश मिळविले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे ही स्पर्धा पार पडली. या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक याने १३ तास ३३ मिनिटांची वेळ नोंदवून आयर्नमॅन किताब पटकावला. १८० कि.मी. सायकलींग, ४२.२ कि.मी. धावणे व ३.८ कि.मी. समुद्रात पोहोण्याचा या स्पर्धेत समावेश आहे. सर्व आव्हाने एकापाठोपाठ कोणतीही विश्रांती न घेता पूर्ण करायची असतात. यासाठी स्पर्धकांच्या शारिरीक क्षमतेचा कस लागतो. जागतिक स्तरावरील व्यावसायिक स्पर्धक यात सहभागी होतात. मात्र,जिद्दीच्या बळावर अभिषेकने हे आव्हान यशस्वीपणे पेलले.  उत्तम वेळेची कामगिरी नोंदवत त्याने भारतातील ग्रामीण भागातील सर्वात युवा आयर्नमॅन बनण्याची कामगिरी करुन दाखवली. तो बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्याने आयर्नमॅनसाठी तयारी सुरु होती. अभिषेक हा एक व्यावसायिक असून त्याची स्वत:ची सायकल ट्रेडींगची कंपनी आहे. सायकलिंगला प्रोत्साहन मिळावे व युवकांची तब्येत अधिक सुदृढ ठेवण्याचा संदेश अभिषेक याने युवकांना दिला आहे.

सुप्रिया सुळे यांनी केले अभिनंदन 

दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे पार पडलेल्या जागतिक पातळीवरील आयर्नमॅन स्पर्धेत बारामती येथील अभिषेक सतीश ननवरे याने यश संपादन केले. ही अतिशय खडतर स्पर्धा त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी पुर्ण केली. या उज्ज्वल यशाबद्दल अभिषेक, त्याचे प्रशिक्षक व‌ पालकांचे हार्दिक अभिनंदन.‌

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेSouth Africaद. आफ्रिकाCyclingसायकलिंगEducationशिक्षण