शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

शिधापत्रिकेवर मिळणार लोह-आयोडिनयुक्त मीठ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 12:06 AM

पुणे-नागपूरमध्ये सुरुवात; ७५ टनांची मागणी नोंदविली

- विशाल शिर्के पुणे : शिधापत्रिकेवर नागरिकांना रास्त धान्य आणि साखरेबरोबरच आहाराची सकसता वाढविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने पाऊल उचलले आहे. महिलांमधील अ‍ॅनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारने ‘लोह आणि आयोडिनयुक्त’ मीठ पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी ७५ टन मिठाची मागणी नोंदविल्याची माहिती अन्न धान्य पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.सध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू, तांदूळ, साखर देण्यात येते. देशासह राज्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढत आहे. चौथ्या आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यात सहा महिने ते ५ वर्षे वयाच्या ५३.८ टक्के मुलांत आणि १५ ते ४९ वर्षे वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के इतक्या भयंकर प्रमाणात अ‍ॅनिमियाग्रस्तांचे प्रमाण आढळले आहे.लोह आणि इतर पोषक द्रव्ये मिळाल्यास अ‍ॅनिमिया नियंत्रणात आणता येऊ शकतो. अ‍ॅनिमिया नियंत्रणात आणण्यासाठी लोह व आयोडिनयुक्त मीठ वितरीत करण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने सरकारकडे सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर पथदर्शी प्रकल्प म्हणून १२ महिन्यांसाठी लोहयुक्त मीठ पुणेनागपूर शहरातील शिधापत्रिकाधारकांना वितरीत करण्यात येणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लोह व आयोडिनयुक्त (डबल फोर्टिफाइड) मीठ सुरुवातीस १२ महिन्यांसाठी उपलब्ध होणार आहे. टाटा ट्रस्टमार्फत या मिठ पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांना हे मीठ १४ रुपये किलो दराने उपलब्ध असेल.

टॅग्स :Puneपुणेnagpurनागपूर