शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी इक्बाल दरबार यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:24 IST

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्री दरबार यांचा उल्लेख केला जातो

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी आणि प्रसिद्ध सेक्सोफोन वादक इक्बाल दरबार यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्री दरबार यांचा मानाचा उल्लेख केला जातो. त्यांच्या वादनाचे चाहते केवळ पुणे-मुंबईपुरते मर्यादित नव्हते तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारही त्यांच्या वादनाने भारावून जात असत. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

श्री इकबाल दरबार यांचे कार्य केवळ संगीतपुरते मर्यादित नव्हते. सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सेवाभाव ही त्यांच्या कार्यशैलीची खास वैशिष्ट्ये होती. दरवर्षी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीची सुरुवात त्यांच्या दरबार बँडद्वारे सादर केलेल्या आरतीनेच होत असे. हे केवळ परंपरेचे नव्हे, तर समाजाशी असलेल्या त्यांच्या नात्याचे प्रतीक होते. त्यांनी सीमेवर जाऊन आपल्या वादनाने भारतीय जवानांचे मनोरंजन केले आणि त्या कार्यक्रमातून मिळालेला निधी कृतज्ञता निधी म्हणून सैन्याला दिला. तसेच 'भोई फाउंडेशनच्या' 'पुण्याजागर' उपक्रमासाठीही त्यांनी कृतज्ञता निधी दिला होता. त्यांनी स्थापन केलेल्या 'मोहम्मद रफी आर्ट फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजू कलाकारांना वैद्यकीय आणि आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी ते झटत होते. बँडमधील कलाकार व्यसनमुक्त व्हावेत यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांचे योगदान हे केवळ संगीताच्या क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, ते एका सामाजिक कलाकाराचे, एका सच्च्या देशभक्ताचे आणि एका संवेदनशील माणसाचे होते. 

टॅग्स :Puneपुणेartकलाcultureसांस्कृतिकcinemaसिनेमाDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरmusicसंगीत