शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून माजी खासदार आढळराव पाटलांना आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 12:59 IST

आढळराव यांच्यासोबतच प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले

शिक्रापूर : शिरूर लोकसभा मतदार संघातील कामांचा राजकीय संघर्ष सुरू असतांना विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी येथील कामासाठी खास प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांचेसमवेत स्वतंत्र बैठक गुरुवारी मुंबईत बोलावली आहे. विशेष म्हणजे बैठकीला शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना बोलवण्यात आले आहे. महाआघाडी सरकार पायउतार होताना मंजूर केलेल्या कामांना थेट रद्द करण्याचा शिंदे-फडणवीस सराकरने एककलमी कार्यक्रम राबविला होता. यात सर्वात संवेदनशील विषय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. तो वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ हे जागतिक दर्जाचे बणविण्यासाठी महाआघाडी सरकारने २६९ कोटी २४ लाख रुपयांची मंजुरी दिली होती. तेच काम शिंदे-फडणविसांनी रद्द केले. यावर तात्काळ सरकारच्या वतीने शिंदे आणि फडणवीसांनी खुलासा करीत, आपले सरकार हिंदूहिताचे असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज समाधीचे हे प्रस्तावित काम रद्द न करता त्याचा सुधारीत आराखडा आम्ही करीत आहोत, असे त्यांनी जाहीर केले. यावर शिरुर-हवेलीचे मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांनीही थेट आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी यासंबंधी आपला स्वतंत्र पाठपूरावा थेट मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरू केला असल्याचे सांगितले. याचबरोबर इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र बैठक आयोजित केली असून, त्यासाठी प्रधान सचिवांसह सर्व खात्यांचे अपर मुख्य सचिव यांनाही बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सूचना पत्र मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShirurशिरुरChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाShiv Senaशिवसेना