गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे मोहोळ खून प्रकरणाचा तपास
By नम्रता फडणीस | Updated: January 9, 2024 18:48 IST2024-01-09T18:47:57+5:302024-01-09T18:48:22+5:30
कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी (५ जानेवारी) मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला...

गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे मोहोळ खून प्रकरणाचा तपास
पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मोहोळ खून प्रकरणात आणखी कितीजण सामील आहेत, तसेच मुख्य सूत्रधार कोण? , यादृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे.
कोथरुडमधील सुतारदरा परिसरात शुक्रवारी (५ जानेवारी) मोहोळवर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आला. जमिनीच्या वादातून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उढाण यांना अटक करण्यात आली आहे. कोथरुड पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबेे यांच्याकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मंगळवारी दिले.